Congress will contest Kasba Peth Bypoll Election BJP Mukta tilak kasba peth election date announced  
पुणे

Kasba Peth By-Election : अखेर ठरलं! कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर

सकाळ डिजिटल टीम

Kasba by-election : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक जाहीर झाली आहे.

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकारण चांगलच तापलं आहे. या दरम्यान आज कसबा पेठेतून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

आज सकाळी साडेनऊ वाजता कसबा गणपती व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन कॉंग्रेसचा उमेदवार अर्ज भरण्यास जाणार असल्याचे शहर कॉंग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

पोटनिवडणुकीसाठी आपली तयारी झाली असून विरोधकांकडून कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक जिंकू असा विश्वास, असं धंगेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. धंगेकर यांच्या काळात कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली गेली आहेत.

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचे नाव जाहीर झाले आहे , त्यामुळे कसब्यात आता या दोघांमधील लढत पाहायला मिळेल. दरम्यान या दोघांची नावे जाहीर झाल्याने निवडणूक अधिक रंगतदार होईल असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

Gadchiroli Threat: एटापल्लीतील जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी; ‘लाल सलाम’ पत्रकामुळे गडचिरोलीत खळबळ

SCROLL FOR NEXT