Kasba Peth Bypoll Election BJP Hemant Rasane will file nomination for Kasba by-election maharashtra politics  
पुणे

Kasba Bypoll Election : भाजप-शिंदे गटात ताळमेळच लागेना! भाजपं करणार शक्तीप्रदर्शन अन् शिंदे म्हणतात…

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात विधानसभेच्या दोन आमदारांचे निधन झाल्याने या रिक्त विधानसभ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. यासाठी राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. दरम्यान कसबा पेठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या कसबा मतदारसंघात भाजपचं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे समोर आले आहे.

उद्या भाजपचं शक्तीप्रदर्शन..

भाजपकडून कसब्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिर पायी पदयात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

विधानसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राज ठाकरे आणि नाना पटोले यांनी फोन करून निवडणूकीत उमेदवार न देण्याचं आवाहन केल्याचं समजतंय. दरम्यान कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकी बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे सरसावल्याचे दिसत आहे.

मनसे निवडणूकीतून माघार...

कसबा आणि चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध करा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन केलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने जो उमदेपणा दाखवला तोच महाविकास आघाडीनेही कसबा आणि चिंचवडमध्ये दाखवावा असे पत्र त्यांनी लिहीले आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे देशाला दाखवून देण्याची संधी सर्वांना आहे.

त्यामुळे दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध करावे ही इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. यावरून मनसे कसबा आणि चिंचवड निवडणूक लढवणार नाही हे मात्र स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरलं! भररस्त्यात गोळीबार, वार करत खून; अज्ञात मारेकऱ्यांचा दिवसाढवळ्या धुमाकूळ..

Latest Marathi News Live Update : एकाच घरात दोन पक्ष; चंद्रपुरात पती-पत्नी वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक रिंगणात

Arvind Sawant : "त्यांना डॉबरमॅन म्हणायचे की मांजर?" अरविंद सावंतांचा सुधाकर बडगुजर यांना बोचरा सवाल

Marathwada Crime : मोबाइल घेण्यावरून वाद! आधी सिगारेटचे चटके दिले आणि नंतर चिरला गळा; चौघांवर गुन्हा, संशयिताला अटक

T20 World Cup 2026 : भारतात खेळा नाही तर...! ICC चा बांगलादेशला थेट इशारा, 'ती' मागणीही फेटाळली

SCROLL FOR NEXT