Kasba Peth Bypoll Election Esakal
पुणे

Kasba Peth Bypoll Election : कसब्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, पक्षश्रेष्ठींचीं डोकेदुखी वाढणार

पुणे पोट निवडणुकीची मुदत एक वर्षाची पण रिंगणात उतरण्यासाठी सगळे इच्छुक

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर काल निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार, यावर आता चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. कसब्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याशिवाय भाजप आणि राष्ट्रवादीच्या संभावित उमेदवारांचीही नावं समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि भाजप या राजकीय पक्षांनी आपापले फासे फेकायला सुरुवात केली आहे.

तर कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे आणि खासदार गिरीष बापट यांची सून स्वराली बापट यांच्या नावाची चर्चा होत आहे. याशिवाय मतदारसंघातील भाजपचं वर्चस्व पाहता भाजप बापट आणि टिळक कुटुंबियांशिवाय इतर कुणाला उमेदवारी देणार की नाही, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

तर कसब्यातील पोटनिवडणुकीची चर्चा सुरू होताच पक्षानं सांगितलं तर मी निवडणूक लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलं. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर प्रशांत जगताप आणि काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांच्या नावांचीही चर्चा आहे.

तर मुक्ता टिळक यांच्यानंतर आमचाच घरात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पण उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी दिली आहे.पुढे बोलताना शैलेश टिळक पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील असेही म्हणाले आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करता कोणते उमेदवार ठरणार, पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे ही तितकच महत्वाचं ठरणार आहे. तर एखाद्या नावाला डावललं गेलं तर पुन्हा पक्षांमधून नाराजीचे सूर दिसून येण्याची शक्यताही तितकीच दाट आहे. तर मुदत एक वर्षाची असली तरी पण रिंगणात सगळे पक्ष उतरण्यास इच्छुक असल्यामुळे कोणते पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावणार हे ही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT