Kasba Peth Residents protest against metro in Pune
Kasba Peth Residents protest against metro in Pune 
पुणे

पुणे : कसबा पेठ रहिवाशांचा मेट्रोला विरोध (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात मेट्रोचे काम जोरात सुरु असताना दुसरीकडे मेट्रो प्रकल्पाला शहरातील कसबा पेठेत जोरदार विरोध होताना दिसून आला. 

पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे सध्या काम युध्दपातळीवर सुरु आहे. पुणेकरांना रोज या कामामुळे ट्रॅफिक जाम आणि वाहनांसाठी उपलब्ध होणारी कमी जागा या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी पुण्याचे ट्रॅफिक सुरळीत व्हावे यासाठीही पुणे ट्रॅफिक पोलिसांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. तरीही कसबा पेठेतील रहिवाशांनी मेट्रोला विरोध केला आहे. 

यासंदर्भात कसबा पेठेतील लोकांनी येथे मेट्रो होऊ नये यासाठी आज आंदोलन केले. मेट्रो स्टेशन होऊ देणार नाही यासाठी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरा समोर रहिवाशांनी आंदोलन केले. 

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कसबा पेठेत मेट्रो स्टेशन होत आहे. यामुळे 200 ते 300 कुटूंबांना स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली आहे. कसबा पेठेतील ऐतिहासिक स्थळांना या कामामुळे धक्का लागणार नसला तरी काही कुटूंबांना मात्र स्थलांतर करावे लागणार आहे. या अडचणीमुळे येथे मेट्रो स्टेशन होऊ नये अशी मागणी आंदोलन करुन येथील स्थानिकांनी केली.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT