पुणे

दुष्काळात मुक्या जनावरांसाठी धावून आले एकता प्रतिष्ठान

CD

UPR26B08996
कासेगाव (ता. पंढरपूर) : एकता प्रतिष्ठानच्या वतीने जनावरांना मोफत चारा वाटप करताना विजयसिंह देशमुख, अमजद इनामदार, प्रशांत देशमुख, दाजी देशमुख आदींसह पदाधिकारी व शेतकरी.
---
मुक्या जनावरांसाठी धावून आले एकता प्रतिष्ठान
दुष्काळामुळे कासेगावमध्ये सहा टन हिरव्या चाऱ्याचे मोफत वाटप
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १७ : दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असताना, कासेगाव येथील एकता प्रतिष्ठानने मुक्या जनावरांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे पाच ते सहा टन हिरव्या चाऱ्याचे मोफत वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे प्रमुख अमजद इनामदार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा आणि पाण्याची मोफत व्यवस्था करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी विविध सामाजिक संस्थांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी (ता. १७) हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख यांच्या हस्ते पशुपालकांना चारा वाटप करण्यात आला.
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पशुपालकांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ही गरज लक्षात घेऊन दरवर्षी विवाह सोहळे, दिव्यांग व गरजू व्यक्तींना सायकल वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या एकता प्रतिष्ठानने यंदा मुक्या जनावरांसाठी चारा वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी माजी उपसभापती प्रशांत देशमुख, माजी सरपंच दाजीसाहेब देशमुख, सिकंदर मुलाणी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष चिराग इनामदार, मुस्लिम सामाजिक विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख यांच्यासह कासेगावातील पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी एकता प्रतिष्ठानचे अमोल खिलारे, जितेंद्र देशमुख, इस्माईल मुलाणी, आसिफ पठाण, हैदर मुलाणी, संतोष कलुबरमे, शशिकांत खिलारे व महादेव खिलारे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT