पुणे

जेऊरमध्ये १० नोव्हेंबरपासून काशीलींग देवस्थानचा यात्रा महोत्सव १४ ला मुख्य सोहळा रथोत्सव; १५ नोव्हेंबरला जंगी कुस्त्यांचे मैदान, सहा दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

CD

JEU26B08572
ग्रामदैवत श्री काशीलिंग
---
जेऊरमध्ये मंगळवारपासून
काशीलिंग देवस्थानची यात्रा
सहा दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ६ : तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत स्वयंभू श्री काशीलिंग देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव १० ते १५ नोव्हेंबरदरम्यान उत्साहात साजरा होणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला भव्य महारथोत्सव, तर १५ नोव्हेंबरला जंगी कुस्त्यांचे मैदान हे यात्रेचे मुख्य आकर्षण असेल.
मंगळवारी (ता. १०) ह.भ.प. संजय पाटील यांचे आध्यात्मिक व विनोदी कीर्तन होणार आहे. बुधवारी (ता. ११) शास्त्रीगुरू यांचे जीवनदर्शन प्रवचन, भजन व संगीत कार्यक्रम होतील. गुरुवारी (ता. १२) हास्यरंगमंच व हास्यरसमंजरी कार्यक्रमांतून मनोरंजनाची मेजवानी मिळेल. शुक्रवारी (ता. १३) झी कन्नड ‘सा रे ग म प’ गायकांचे स्वरसंमेलन रंगणार आहे.
शनिवारी (ता. १४) रात्री आठ वाजता भव्य महारथोत्सव होणार असून, आकर्षक रथ मिरवणूक, शोभेचे दारूकाम, गोंधळी खेळ तसेच सांस्कृतिक व सामाजिक नाटकांचे सादरीकरण होईल. रविवारी (ता. १५) सायंकाळी चार वाजता नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे मैदान रंगणार असून, रात्री दहाला सामाजिक बैलाट कार्यक्रम होईल.
भाविकांसाठी अक्कलकोट शहर, रेल्वे स्टेशन व तडवळ येथून जेऊरपर्यंत टमटम व जीपची मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. विविध मंडळांच्या वतीने महाप्रसाद, तर श्री बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, जेऊर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्ट व पंचकमिटी यात्रेची तयारी करीत आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Latest Marathi News Update : गडचिरोलीत माओवाद्यांचा कट उधळला; जंगलात जमिनीखाली लपवला होता स्फोटकांचा साठा

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

SCROLL FOR NEXT