BWN26A00129
गोरेगाव ः आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार करताना मान्यवर.
गोरेगावच्या विकासासाठी कटिबद्ध
काशिनाथ दाते ः विविध विकास कामांचे भूमिपूजन
भाळवणी, ता. ३१ ः गोरेगाव हे केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण परिसरात विकासाचे एक वेगळे मॉडेल म्हणून पुढे येत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.
मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे सोमवारी (ता. ३१) विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार दाते यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे होते.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून गोरेगाव येथील संत सावता महाराज मंदिर व संगमेश्वर मंदिर अशा दोन्ही ठिकाणी सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
दाते म्हणाले, बाबासाहेब तांबे यांनी गोरेगावचा विकास करताना एक विशिष्ट व्हीजन समोर ठेवले आहे. गोरेगाव-पारनेर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी तातडीने पाठपुरावा केला जाईल.
बाबासाहेब तांबे म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक गावाचा आणि वाडी-वस्तीचा विकास डोळ्यांसमोर ठेवून काम करणारे नेतृत्व म्हणजे आमदार दाते. जिल्हा परिषदेचे सभापती असतानाही सरांच्या माध्यमातून गोरेगावमध्ये भरघोस निधी आला, ज्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण शक्य झाले.
श्री गोरेश्वर देवस्थान येथे प्रस्तावित सभागृहाची संकल्पना बाबासाहेब तांबे यांनी मांडताच, आमदार दाते यांनी काम त्वरित सुरू करा, ५० लाख रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देतो, अशी घोषणा केली. तसेच, गोरेगावसाठी १ कोटी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाल्याबद्दल शेतकरी बांधवांनी आमदारांचे आभार मानले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप रोहोकले, सरपंच सुमन तांबे, माजी सरपंच राजाराम नरसाळे, मीराताई नरसाळे, तंटामुक्ती अध्यक्ष दादाभाऊ नरसाळे, गण प्रमुख प्रकाश रोहोकले, ग्रामपंचायत सदस्य गणेश तांबे, साहेबराव नरसाळे, सुरेश चौरे, ऋषिकेश नरसाळे, भाऊसाहेब तांबे, अनिल नरसाळे, प्रितेश पानमंद यांसह ''बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन'', संगमेश्वर मित्र मंडळ व संत सावता महाराज मित्र मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.