walnuts 
पुणे

काश्‍मीरचा अक्रोड पुण्यात मिळणार सवलतीच्या दरात

सकाळवृत्तसेवा

पुणे - पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्‍मीर खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांना पुण्याशी जोडण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. तेथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले अक्रोड सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत. 

सफरचंद, आक्रोड, केशर आणि बदामसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्‍मीरच्या चिनाब खोऱ्यातील ऑरगॅनिक कात्रज येथील सरहद संस्थेत आजपासून सकाळी ११ ते ५ या वेळेस विक्रीस उपलब्ध झाले असून रुपये प्रतिकिलो ३००, ३५०, ४०० अशा दरात हे उपलब्ध असणार आहेत, ही माहिती सरहद संस्थेचे ॲड. चंद्रकांत घाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘चिनाब खोरे म्हणजे दोडा, किश्‍तवाड, रामबन हा भाग येतो. जम्मू काश्‍मीरमधील या भागात सध्या दहशतवाद व अस्थिरता पसरविण्याचा शत्रूचा प्रयत्न असून अनेक वर्षे उपेक्षित असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या भागातील शेतकऱ्यांचा पुणेकरांशी नाते जोडण्याचा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ७५०७१३८७९२, ८००७८७८६९८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन नहार यांनी केले आहे.

काश्‍मीरमधील ३७० कलम काढल्यानंतर तेथील शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री होत नव्हती. त्यानंतर लॉकडाउन सुरू झाल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अक्रोड पुण्यात विक्री करण्यासाठी काश्‍मिरी शेतकऱ्यांना पुण्यात बोलावले आहे.
- संजय नहार, संस्थापक, सरहद

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT