Uday Samant sakal
पुणे

Uday Samant Update : मुख्यमंत्री पद गेले आहे हे काहीजण स्वीकारायला तयार नाहीत

आपल्याकडे लोकशाही असून यामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मात्र, मुख्यमंत्री पद गेले आहे हे काहीजण स्वीकारायला तयार नसल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - आपल्याकडे लोकशाही असून यामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मात्र, मुख्यमंत्री पद गेले आहे हे काहीजण स्वीकारायला तयार नसल्याचे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

एस एम जोशी सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय परिवर्तन युवा परिषदेचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, प्रदीप लोखंडे, शेखर वाल्हेकर उपस्थित होते.

सामंत म्हणाले, 'हे परिवर्तनपीठ आहे. पुण्यात जे परिवर्तन होते ते त्याचे पडसाद पूर्ण देशात उमटतात. अजित पवार यांनी केलेल्या परिवर्तनाचे पडसाद देशभरात उमटतील. राजकारणात ज्याचा थेट संपर्क असतो तो परिवर्तन करतो.

त्याचे उदाहरण म्हणजे आमदार धंगेकर आहेत. परिवर्तनसारखे व्यासपीठ आम्ही महाविद्यालयात असताना नव्हते, आज अशी व्यासपीठे उपलब्ध होत असल्याचा आनंद आहे. ऐकण्यापेक्षा आपण प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. संवाद झाल्याशिवाय एकमेकांच्या अडचणी कळणार नाहीत.

रतन टाटा आणि सिरमचे अदर पूनावला यांचा आम्ही सन्मान केला, अशा लोकांकडून युवकांनी शिकण्याची गरज आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो ते क्षेत्र मोठे झाले पाहिजे ही भावना असायला हवी. परिवर्तन ही संस्था चांगले काम करत असून तिचा पक्ष करू नका, पण परिपक्व राजकीय कार्यकर्ते घडवा. ती काळाची गरज असल्याचेही सामंत म्हणाले.

सामाजिक संस्थांचा पत्ता कसबा मतदारसंघ म्हणजेच सदाशिव पेठेचा असतो. पुण्यात जे पिकते ते देशभर विकते. परिवर्तन संस्थेने युवकांना दिशा देण्याचे काम केले असल्याचे आमदार धंगेकर यांनी म्हटले. कार्यक्रमाचे आभार सचिन जगताप यांनी तर सूत्र संचालन स्वामिराज भिसे यांनी केले.

'चांगल्या तरुणांनी राजकारणात आले तर राजकारणाची प्रतिमा बदलेल, असे मत विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय आणि सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. तरुणांनी राजकारणात का यावे? या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय म्हणाले, 'पोलिस आणि राजकारणी रस्त्यावर दिसले की, लोकांच्या मनात शंका येते. राजकारण्यांची समाजात बदमाश प्रतिमा झालेली आहे. ही प्रतिमा बदलविण्याचे काम केवळ तरुण करू शकतो. महात्मा गांधी, नेहरू, पटेल हे त्या काळात तरुण होते, म्हणून ते स्वातंत्र्याची चळवळ उभी करण्यात यशस्वी झाले. समाजव्यवस्थेला बदलायचे असेल तर तरुणांना या व्यवस्थेत यावे लागेल.

भारतात राजकारण हे एकमेव क्षेत्र असे आहे जिथे येण्यासाठी कुठलेही शिक्षण नाहीतर, केवळ इच्छाशक्ती लागते. राजकारणातील करिअर हे नगरसेवक आमदार नसून आता अनेक दालने खुली झाली आहेत. जनसंपर्क, वॉररूम, सोशल मीडियाच्या माध्यमांतून प्रचंड मोठी संधी निर्माण झाली आहे.

तांबे म्हणाले, 'कामाला महत्व न देता टीका-टिप्पणी करणाऱ्याला मतदान करणार नाही, असे म्हणणारा युवक जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत समाज बदलणार नाही. राजकारण करताना प्रत्येकाला संधी आहे. केवळ लोकप्रतिनिधी हा राजकारणी नसून त्या व्यवस्थेतील प्रत्येकजण राजकारणीच असतो.

ज्यांना राजकारणात यायचे आहे. त्यांनी त्यांच्या भागातील लोकांच्या अडचणीच्या मुद्द्यावर चळवळ उभी करावी लागते, त्यावर प्रामाणिकपणे काम केले तर राजकारणात पैशाची गरज लागत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तरुणांनी सहभाग घ्यायला हवा जेणेकरून आजचे हे लोकप्रतिनधी उद्याचे आमदार-खासदार असतील.

आपली लोकशाही परिपक्व नाही, ती करायची असेल तर तरुणांचा सहभाग आवश्यक आहे. त्याचबरोबर, विकास ही प्रक्रिया नसून तो खेचून आणावा लागतो. ज्याच्यात धमक आहे तोच विकास करू शकतो, असेही तांबे म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT