Katraj Dairy
Katraj Dairy sakal
पुणे

Katraj Dairy : डेअरी प्रक्रिया उद्योगाचे आरक्षण कायम ठेवा ; दूध संघाच्या संचालक मंडळांसह उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांची मागणी

अशोक गव्हाणे

कात्रज : महापालिकेने कात्रज डेअरीच्या जागेवरील एमपीजी-१ आरक्षण वगळून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी हरकती सूचनांची सुनावणी शहर अभियंता यांच्यासमोर नुकतीच पार पडली. यावेळी डेअरीच्या बाजूने संचालक मंडळांसह दूध उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांनी डेअरी प्रक्रिया उद्योगाचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली.

सुनावनीसाठी जिल्हातील दूध उत्पादक शेतकरी, दूध वितरक, दूध वाहतुकदार, कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अध्यक्ष भगवान पासलकर, संचालक गोपाळराव म्हस्के, अरुण चांभारे, चंद्रकांत भिंगारे, राहुल दिवेकर, स्वप्निल ढमढेरे, व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये उपस्थित होते. तसेच, संघाचे कर्मचारी यांनी एमपीजी-१ आरक्षण उठवून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी सूनावणी वेळी सूचनाही केल्या.

कात्रज येथील सर्व्हे क्रमांक १३० ते १३३ ही जागा पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित कात्रज (कात्रज डेअरी) साठी १९६९पासून महाराष्ट्र शासनाने दुध संघास दुध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्रक्रिया प्रकल्पासाठी दिलेली असुन त्यानंतर २०१३मध्ये जिल्हाधिकारी महसुल शाखा यांनी ही जागा संघाच्या नावे केली आहे.

एनडीडीबीमार्फत अनुदानीत मंजुर डेअरी विस्तारीकरणाचा ११० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झालेला होता. परंतु, सदरचे आरक्षण असल्यामुळे मंजुर डेअरी विस्तारीकरणाला अडचण निर्माण होत आहे. तसेच, पुणे जिल्हातील ११ तालुक्यातील ९०० दूध उत्पादक संस्थांचे हजारो दूध उत्पादक शेतकरी कुटुंब, दूध वितरक व संघाचे १२०० कर्मचाऱ्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह संघावर अवलंबून असल्याची माहिती अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT