Bhagwan Pasalkar sakal
पुणे

Katraj Dairy : कात्रज डेअरीचे भगवान पासलकर नवनिर्वाचित अध्यक्ष; तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर कायम

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदी भगवान पासलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षपदी भगवान पासलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पासलकर यांच्या निवडीने संघाच्या ६३ वर्षाच्या इतिहासात वेल्हे तालुक्याला पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर यांची नियुक्ती कायम आहे.

संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्या जागेच्या निवडीसाठी सोमवारी (ता. १२) अध्यासी अधिकारी तथा सहकारी संस्थांचे (दुग्ध) विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संघाचे संचालक मंडळाची सभा झाली. या सभेत अध्यक्ष पदासाठी संचालक कालीदास गोपाळघरे यांनी पासलकर यांचे नांव सुचविले.

तर, त्यास संचालक स्वप्नील ढमढेरे यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणाचाच अर्ज नसल्याने डॉ. कदम यांनी पासलकर यांची संघाचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. पासलकर हे २००९ पासून संघाचे संचालक आहेत. यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा कामगारांच्या वतीने कात्रज दुग्धालयाच्या आवारातील श्री साईबाबा मंदिराच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी ही निवड माझी नसून वेल्हे तालुक्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून केलेली निवड आहे. या बद्दल जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांचे पासलकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन संघाचे दूध संकलन वाढविणे आणि आर्थिक घडी सुरळित करुन संघाच्या नावलौकिकात भर टाकण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्याप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उत्तमप्रकारे चालते, त्यामुळे बँक आज देशात वरच्या क्रमांकावर आहे.

त्याचप्रमाणे पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे कामकाज देखील त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करुन संघाचा नावलौकिक वाढविणार असून जल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अधिकाधिक हित साधण्यास माझे प्राधान्य असेल.

- भगवान पासलकर, नवनिर्वाचित अध्यक्ष, कात्रज डेअरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT