Crime sakal
पुणे

Katraj News : कात्रज घाटात लुटमारीचे प्रकार वाढले; पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल

गेल्या काही दिवसांपासून कात्रज घाटामध्ये दुचाकीस्वार तसेच पायी चालणाऱ्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करण्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - गेल्या काही दिवसांपासून कात्रज घाटामध्ये दुचाकीस्वार तसेच पायी चालणाऱ्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत लूटमार करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून लवकरात लवकर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मागील दोन दिवसांत लूटमार व दमदाटी करुन मोबाईल हिसकावून घेण्याबाबतचे चार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

शनिवारी (ता. ५) रात्री साडेदहा वाजता आणि रविवारी (ता. ६) पहाटे साडेपाचच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी कोयत्याचा धाक दाखवत व मारहाण करत कात्रज येथील रहिवाशी युवक विघ्नेश गोसावी व रोहित माठारे यांना अंगावर गाडी घालत व कोयत्याने मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार घडला.

तसेच, भिलारेवाडी येथील शुभम तारू, विकास भुजबळ, नारायण म्हेत्रे हे कात्रज घाटाकडे सकाळी चालण्यासाठी गेले असताना त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवत मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्याकडे असलेले मोबाईल हिसकावून घेऊन कात्रजच्या दिशेने आरोपी निघून गेले. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम करत आहेत.

कात्रज चौकातही भुरटे चोर

कात्रज चौक परिसरात रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर काही भुरटे चोर प्रवाशांना लुटण्याच्या उद्देशाने फिरत असतात. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भिती आणि असुरक्षितता निर्माण झालेली दिसते. कात्रज चौक परिसरात अशा भुरट्या चोरांच्या वाढत्या सक्रियतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेची गंभीर चिंता निर्माण झाली असून पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया

चारही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून याचा कसून तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडून सुरु आहे. याबाबत अज्ञात आरोपींचा शोध घेऊन तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच, कात्रज चौकातील परिसरात काही गैरप्रकार घडत असतील तर संबधितांनी तक्रार द्यावी, आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करु.

- दशरथ पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक भारती विद्यापीठ, पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT