Katraj Rain sakal
पुणे

Katraj Rain : कात्रज परिसरात पावसाची जोरादार हजेरी; पेशवे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले

कात्रजसह डोंगरमाथ्यावर व परिसरात मागील २४ तासात पावसाने जोरदार हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कात्रजसह डोंगरमाथ्यावर व परिसरात मागील २४ तासात पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन-तीन दिवसांपासून संततधार आणि मागील काही तासापासून जोरदार सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांना ओढे-नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे.

कात्रज डोंगरमाथा व घाट परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून आणणारे गुजरवाडी ओढा व मांगडेवाडी ओढा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून पाटबंधारे विभागाने पूर्ण क्षमतेने विसर्ग सुरू केला आहे.

कात्रज तलावातुन ओढ्यात मोठ्या प्रमाणात फांद्या वाहून येत होत्या. त्यामुळे मुख्य प्रवाहास अडथळा येत होता. स्थानिकांनी त्या फांद्या हटवून प्रवाह सुरळित केला. नवीन वसाहत येथील नाल्यातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पासून पुढे आंबील ओढ्यामधून पाणी पुढे जाते त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पाहणी करत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

बुलेट्स

-कात्रजसह गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी पाझर तलाव तुंडुंब

-सांडव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सुरु

-कात्रज, कोंढवा, टिळेकरनगर, येवलेवाडी, कोंढवा रोड, गोकुळनगर, भारती विद्यापीठ, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांना ओढे नाले याचे स्वरुप

-कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक मंदावली

-कात्रज-मांगडेवाडी रस्त्यावरील खाजगी कंपनीची भिंत कोसळून एका चारचाकीचे नुकसान

-माऊली नगर येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

-लेक टाऊन, महालक्ष्मीनगर सोसायटी येथे झाड कोसळल्याची घटना

-राजस आणि उत्कर्ष सोसायची परिसराती दिवसभर विजपुरवठा खंडित

-राजस सोसायटी चौकाला तळ्याचे स्वरुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT