Katraj Kondhwa road traffic sakal
पुणे

Katraj Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता बनला अपघाती मृत्यूचे प्रवेशद्वार

पुणे शहराच्या दक्षिण भागात असलेला कात्रज-कोंढवा रस्ता गेल्या काही वर्षांपासून अपघाती मृत्यूचे प्रवेशद्वारच बनला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराच्या दक्षिण भागात असलेला कात्रज-कोंढवा रस्ता गेल्या काही वर्षांपासून अपघाती मृत्यूचे प्रवेशद्वारच बनला आहे. कात्रज ते खडी मशिन चौक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर वर्षभरात तब्बल २४ मोठे अपघात झाले असून यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात आणि मृत्यूची संख्या पाहता या रस्त्यावर दर महिन्याला सरासरी दोन अपघात आणि किमान एक मृत्यू होत आहे.

केवळ सरकारी दप्तरी नोंदल्या गेलेल्या अपघातांची ही आकडेवारी असून, याशिवाय दररोज होणारे किरकोळ अपघात वेगळेच आहेत. आजघडीला या रस्त्यावर दररोज एक किरकोळ अपघात होत असल्याचे इस्कॉन मंदिर चौकाजवळ राहणारे प्रवीण खैरे यांनी सांगितले.

कात्रज चौकापासून खडी मशिन चौकापर्यंत हा रस्ता जातो. या चौकात आल्यानंतर पुढे हा रस्ता तीन दिशांकडे जातो. यामध्ये उंड्री-पिसोळी, मंतरवाडीमार्गे हडपसरला जाणारा एक रस्ता, बोपदेव घाटमार्गे सासवडला जाणारा रस्ता दुसरा आणि लष्कर परिसराकडे जाणाऱ्या तिसऱ्या रस्त्याचा समावेश आहे.

अवजड वाहतूक

या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. यामध्ये मोठ्या ट्रक, टॅंकर, कंटेनर, डंपर, १६ व १८ चाकी वाहनांची वाहतूक होते.

आवश्यक उपाययोजना

  • या रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करणे

  • वाहतूक नियमनासाठी पोलिसांची संख्या वाढविणे

  • चौकाचौकांत आणि उताराच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक

  • जड वाहनांना वाहतुकीची शिस्त लावणे

  • चौकाचौकांत चारही बाजूंनी घुसणाऱ्या वाहनांवर कारवाई

  • एकेरी वाहतूक सुरू करणे

  • रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे

  • गरजेनुसार गतिरोधक बसविणे

  • वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे

  • वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करणे

  • उताराच्या ठिकाणी गतिरोधक बसविणे आणि वाहतूक नियमन करणे

  • रस्ता दुभाजक बसविणे

अपघात आणि कोंडीची कारणे

  • या रस्त्याचे रखडलेले आणि संथगतीने सुरू असलेले काम

  • वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांची वाणवा

  • अवजड वाहन चालकांची बेशिस्त

  • रस्ता ओलांडताना गुणाकाराच्या चिन्हाप्रमाणे चारही बाजूंनी मध्येच आडवे घुसणारे वाहन चालक

  • रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे

  • गर्दी असतानाही वेगाने वाहन चालविणाऱ्यांचा मोठी संख्या

  • गतिरोधकांचा अभाव

  • उताराच्या रस्त्यावरही गतिरोधक नसणे

  • रस्ता दुभाजकांचा अभाव

नित्याचीच वाहतूक कोंडी

या रस्त्यावर दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे. परिणामी, पाच मिनिटांत पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी किमान पाऊण ते एक तास वेळ लागत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात 22 लाख कोटींचे नुकसान! सलग तिसऱ्या दिवशी बाजार लाल रंगात बंद; कोणत्या सेक्टरला फटका?

T20 World Cup : मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?

चित्रपटाला लाजवेल अशी कहाणी! पुण्यात घटस्फोटासाठी चक्क पत्नीने दिली पतीला पोटगी, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : जयदेव ठाकरे यांच्या अंगरक्षकाची बॅग आणि सरकारी पिस्तूलची चोरी

शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT