Katraj News

 

sakal

पुणे

Katraj News: कात्रजमध्ये दुर्गंधीचा त्रास! नानासाहेब पेशवे तलाव परिसरात कचऱ्याचा साठा

Piled-Up Waste Under the Bridge Creates Nuisance for Citizens : नानासाहेब पेशवे तलाव परिसरात दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा साठा, तलाव परिसरात दुर्गंधीचा कहर; कचऱ्याच्या ढिगाऱ्याने नागरिक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा

कात्रज: नानासाहेब पेशवे तलाव परिसरातील पाटीलवाडा भागात, पुलाखाली गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहून आलेला कचरा साचून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्यामुळे सकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक आणि पर्यटक दोघेही त्रस्त झाले आहेत.

तलावाच्या काठावर व पुलाखाली विविध प्रकारचा कचरा, प्लास्टिक, कुजलेले पदार्थ, झाडांच्या फांद्या आणि अन्य घनकचरा जमा झाला आहे. पावसानंतर हा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून येऊन येथे साचला असून, स्वच्छतेअभावी दुर्गंधी वाढली आहे. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे या घोषवाक्याला साजेसं वातावरण राखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने या ठिकाणी स्वच्छतेची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नानासाहेब पेशवे तलाव हा कात्रज परिसरातील एक महत्त्वाचे ठिकाण असून येथे दैनंदिन अनेक नागरिक आणि पर्यटक येत असतात. मात्र, तलाव परिसरातील अशा अस्वच्छतेमुळे परिसराचे सौंदर्य मलिन होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

याबाबत कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांनी हा कचरा पाण्यात असून उद्यान विभागाने याबाबत कार्यवाही करत तो बाहेर काढण्यात यावा त्यांनतर आरोग्य विभागाच्या गाड्यांकडून तो उचलून विल्हेवाट लावण्यात येईल असे सांगितले.

ऐन दीपावलीत हा कचरा साठला आहे, यावर योग्य वेळी कार्यवाही करून तलाव परिसर स्वच्छ करावा, पालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा

- हेमंत धायबर, स्थानिक नागरिक

याबाबत संबधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तलावाची तातडीने स्वच्छता करण्यात येईल, तसेच यापुढे कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.

-अशोक घोरपडे, मुख्य उद्यान निरीक्षक, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News: खताच्या गोणीमागे ३७५ रुपयांपर्यंत वाढ; शेतकऱ्यांना फटका; खरीपपूर्व तयारीत खर्च वाढून आर्थिक गणित कोलमडण्याची भीती

Parbhani News: पालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप; रस्ते, नालेसफाई, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन रखडले

Latest Marathi News Live Update: बुलढाण्यात युवक काँग्रेस विरुद्ध गायकवाड समर्थक आमनेसामने; घोषणाबाजीने तणाव वाढला

Char Dham Yatra: "चारधाम यात्रेची तयारी जबरदस्त!"ऋषिकेशमध्ये सुनील शेट्टीकडून पोलिसांचं कौतुक; अफवांबद्दल काय बोलला ?

Pune Politics: “माणसे फोडणे, पैशाचे राजकारण भाजपचा उद्योग”; संजय राऊतांचा हल्लाबोल, पुण्यातील शिवसेनेचे मारेकरी भाजपच!

SCROLL FOR NEXT