Katraj Navale Bridge Road sakal
पुणे

Katraj Navale Bridge Road : कात्रज-नवले पूल रस्ता होणार तरी कधी? संथ कामामुळे नागरिक त्रस्त

कात्रज ते नवले पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम) विभागाकडून सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कात्रज ते नवले पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम) विभागाकडून सुरू आहे. मात्र, याठिकाणी सुरू असलेल्या संथ कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कात्रज ते नवले पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने डिसेंबर २०२४पर्यंत या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, डिसेंबरपर्यंत तरी हे काम पूर्ण होईल का? ही शंका आहे. अनेक दिवसांपासून संथ गतीने हे काम सुरू आहे. जुना भुयारी मार्ग छोटा असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत.

राजमाता भुयारी मार्ग पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्याचबरोबर आंबेगावमधील पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे कामही दोन आठवड्यांत पूर्ण होईल. त्यानंतर या भुयारी मार्गांमधून वाहतूक सुरू करण्यात येईल. परिणामी, वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

असा आहे कात्रज ते नवले पूल रस्ता

  • एकूण अंतर : ३.४०९ किलोमीटर

  • मुख्य रस्ता : ६० मीटर (रुंद)

  • मुख्य महामार्ग रस्ता : ३६ मीटर (दोन्ही बाजूंना प्रत्येकी १८ मीटर)

  • पदपथ - सहा मीटर (दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मीटर)

  • सेवा रस्ता - १४ मीटर (दोन्ही बाजूंना प्रत्येकी सात मीटर)

  • दुभाजक - चार मीटर

महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्या, पावसाळी वाहिन्या, विद्युत वाहिन्या, एमएनजीएल वाहिन्या असल्याने त्यांचे अडथळे पार करत काम करावे लागले. त्यामुळे कामाला उशीर झाला. मात्र, आता कामाला गती देण्यात आली आहे. मुख्य रस्त्यात येत असलेल्या अडचणी पार करण्यासाठी त्या-त्या खात्यांना पत्रव्यवहार करून कामे करावी लागत आहेत.

- अतुल सुर्वे, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम).

कात्रज ते नवले पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सेवा रस्त्यामध्ये येत असलेली अतिक्रमणे तत्काळ काढायला हवीत. कंत्राटदाराला मुदतवाढ मिळाल्याने त्याने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येते. राज्य महामार्ग विकास प्राधिकरणाने तत्काळ याचे स्मरण करून देत कामाला गती द्यायला हवी.

- आशिष भोसले, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT