katraj route sakal
पुणे

Navale Bridge Accident : कात्रज नवा बोगदा ते नवले पुलापर्यंत हॉटेल, लॉज, बारचे पेव

मुंबई-बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना अतिक्रमणांवर कारवाईस सुरुवात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना अतिक्रमणांवर कारवाईस सुरुवात केली आहे.

पुणे - मुंबई-बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात होत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना अतिक्रमणांवर कारवाईस सुरुवात केली आहे. मात्र, कात्रज चौक ते कात्रज घाट आणि कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या परिसरात हॉटेल्स, रेस्टॉरंट‌, बार, लॉजचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बेकायदा पार्किंग, चारचाकी वाहने व पानटपऱ्यांचे सेवा रस्त्यांवरील वाढलेले अतिक्रमण, मद्यपींचा वाढता वावर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या परिसरात वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.

महामार्गावर स्टंटबाजी

संबंधित हॉटेल्स, बार, लॉजमध्ये येणारे ग्राहक मद्यपान करून रस्त्यावरच धिंगाणा घालतात. त्यातून शिवीगाळ, भांडणे होतात. महामार्गालगतच्या अनेक बार, लॉजच्या परिसरात गैरप्रकार वाढले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून ये-जा करणारी वाहने तेथेच थांबतात. रात्रीच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण मद्यपान करून महामार्गावर स्टंटबाजी करतात. त्यातून अपघात होतात.

महामार्गावर काय परिणाम होतो?

हॉटेल, लॉज, बार, रेस्टॉरंट‌मध्ये येणारे ग्राहक सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करतात.

अनेकदा दोन ते तीन लेनमध्ये वाहने बेकायदा लावली जातात.

अनेक हॉटेल, लॉज, बारचे पार्किंग तसेच, त्यांच्या पानटपऱ्या, छोटी दुकाने, पत्र्याचे शेड, ओटाही थेट सेवा रस्त्यावर आहे.

या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्यांना सेवा रस्ता पुरेशा प्रमाणात वापरण्यास मिळत नाही.

परिणामी बहुतांश नागरिक थेट महामार्गावरूनच दुचाकी, चारचाकी वाहने पुढे नेतात.

या प्रकाराबाबत आवाज उठविणाऱ्यांवर दादागिरी केली जात असल्याच्या तक्रारी.

हॉटेल, लॉज, बारच्या बाहेरील सेवा रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जाते. संबंधितांना जाब विचारल्यास आम्हाला धमकाविले जाते. त्यामुळे आम्हाला नाइलाजास्तव सेवा रस्त्याऐवजी महामार्गावरून घरी जावे लागते. महापालिका, पोलिस यांच्याकडून संबंधितांवर कुठलीही कारवाई होत नाही.

- विनोद कचरे, स्थानिक नागरिक

महापालिका, पोलिसांचे दुर्लक्ष !

महामार्गालगत हॉटेल, बार, लॉजची संख्या वाढली असून, अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने तर गैरप्रकार घडत असतानाही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबतची माहिती व सूचना आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT