Rajiv Gandhi Zoological Park sakal
पुणे

पुणे : दोन वर्षानंतर कात्रजचे प्राणीसंग्रहालय खुले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय अखेर आज पर्यटकांसाठी खुले

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय अखेर आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. प्राणी संग्रहालय सुरू झाल्याने पर्यटकांसह लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सुटीचा दिवस असल्याने सकाळी लवकरच प्राणी संग्रहालयाच्या बाहेर पर्यटकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. संग्रहालय प्रशासनाच्यावतीने पहिल्या दिवशी पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी वर्गासह कर्मचाऱ्यांनीही पर्यटकांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले. यावेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचित्रा सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. प्राणी संग्रहालयामध्ये लेपर्ड कॅट, शेकरू व जंगल कॅट हे नवीन प्राणी आकर्षण पर्यटकांसाठी ठरत आहेत. याशिवाय बिबट्या, गवा, अस्वल यांच्यासह सरपटणारे प्राणी, सारंग, सुरंग वर्गातील प्राणी पाहायला मिळत असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करत आहेत.

''दोन वर्षानंतर राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पर्यटकांना राज्य प्राणी शेकरू, जंगल कॅट, लेपरड कॅट हे नवे प्राणी पाहायला मिळणार आहेत. पर्यटकांना प्रवेश करण्यापूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसे दोन्ही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. तरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश देण्यात येत आहे.'' - डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणीसंग्रहालय

''कात्रज उद्यान चालू होणार हे माध्यमातून कळाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब बाहेर पडलो. मुले खुप आनंदी आहेत. तब्बल दोन वर्षानंतर प्राणी संग्रहालयात येऊन प्राणी पाहण्याचा आनंद घेता येत आहे.'' - दीपक कुमार, पर्यटक, धानोरी

''दोन वर्षातून बाग चालू होतेय. त्यामुळे खरंच खुप आंनद होत आहे. बाग अतिशय सुदंर ठेवण्यात आली असून सर्व प्राणी कुटुंबासोबत पहायला मिळाले. घरापासून जवळच असल्यामुळे प्राणी संग्रहालयात येणे सोयीचे आहे.'' - नंदिनी वर्ध, सदाशिव पेठ, पर्यटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT