Partial work  Sakal
पुणे

Katraj News : पाणीपुरवठा विभागाच्या संथ कामामुळे रखडले रस्त्याचे काम

There is a huge traffic jam in the area : राजमाता भुयारी मार्ग ते त्रिमुर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्थिती; नागरिक संतप्त

सकाळवृत्तसेवा

कात्रज - भारती विद्यापीठ परिसरातील राजमाता भुयारीमार्ग ते त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पथविभागाने संबंधित रस्त्याचे काम हाती घेतल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून २४/७ साठी पाण्याची लाईन टाकण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाकडून खड्डा खोदून ठेवल्याने पथविभागाचे काम थांबले असून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे.

त्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद असून परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. मुलांच्या शाळेच्या बस सोसायटीमधे येऊ शकत नाहीत. वृद्धांनाही रिक्षा मिळविण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीपुरवठा विभागाला कामाला गती देत काम पूर्ण करुन घेण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, एकदा रस्ता झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करता येत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

राजमाता भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरु असलेले काम
  • पाणीपुरवठा विभागाकडून वाहतूक कोंडी आणि इतर वाहिन्यांची अडचण होत असल्याचे कारण

  • वाहतूक पोलिसांकडून कर्मचारी नेमूनही वाहनचालकांना त्रास; एकेरी रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरु

  • पुढील आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत दुहेरी वाहतूक सुरु करणार असल्याचे पथविभागाचे उत्तर

  • पाणीपुरवठा विभागाने खणलेले खड्डे पथविभाग दुरुस्त करणार

  • उर्वरित अर्ध्या रस्त्यामध्ये ड्रेनेज आणि पावसाळी लाईनचेही होणार काम

  • सकाळ आणि सायंकाळच्यावेळी प्रचंड वाहतूककोंडी

पाणीपुरवठा विभागाने कामाला गती देण्याची गरज असताना संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे आम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. आम्ही काँक्रीटीकरणाची एक बाजू पूर्ण करत आणली असून पुढील आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत नवीन रस्ता वाहतूकीसाठी खुला करणार आहोत.

- दिलीप पांडकर, उपअभियंता, पथविभाग, महापालिका

पाण्याची लाईन टाकताना अनेक अडचणी समोर येत आहेत. त्यात या रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूप असल्याने कामाला गती देता येत नाही. तरीही आमचा प्रयत्न लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा आहे.

- सतिश शिंदे, कनिष्ठ अभियंता, २४/७ पाणीपुरठा विभाग

संबंधित रस्त्यावर वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत का? असा प्रश्न पडतो. संबंधित रस्त्यावर मागील सहा महिन्यापासून केवळ काम सुरुच आहे. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असून आम्हाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

- अर्चना सारडा, स्थानिक नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT