Bhimrao Tapkir Sakal
पुणे

कात्रज सर्पोद्यान ते नारायणपूर पीएमपी बससेवा सुरु

'पीएमपी'कडून कात्रज सर्पोद्यान ते सासवड मार्गे नारायणपूर हा नवीन बस मार्ग (मार्ग-क्रमांक २९३) सुरू करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

'पीएमपी'कडून कात्रज सर्पोद्यान ते सासवड मार्गे नारायणपूर हा नवीन बस मार्ग (मार्ग-क्रमांक २९३) सुरू करण्यात आला आहे.

कात्रज - 'पीएमपी'कडून (PMP) कात्रज सर्पोद्यान (Katraj Sarpodyan) ते सासवड मार्गे नारायणपूर (Narayanpur) हा नवीन बस (Bus) मार्ग (मार्ग-क्रमांक २९३) सुरू करण्यात आला आहे. आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते बससेवेचा लोकार्पण सोहळा कात्रज-सर्पोद्यान येथे पार पडला. तसेच, श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री दत्तगुरूंच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात बसचे स्वागत करत प पू श्री आण्णा महाराज यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.

कात्रज येथे झालेल्या उद्घाटनास नगरसेविका वर्षा तापकीर, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कात्रज आगार प्रमुख विजय रांजणे यांची उपस्थिती होती. या बससेवेचा मार्ग कात्रज सर्पोद्यान, वेळू फाटा, शिवापूर बाग, कोंढणपूर फाटा, खेड शिवापूर, वरवे, केळवडे फाटा, चेलाडी फाटा, कामथडी, कापूरहोळ, दिवळे, बालाजी मंदिर फाटा, केतकावळे, देवडी, चिव्हेवाडी, नारायण धाम, नारायणपूर, पोखर फाटा, भिवडी, वांढेकर वस्ती, घोरेवाडी, सासवड कोर्ट, चौखंडे आळी, जेजुरी नाका, सासवड असा असणार आहे.

यावेळी तापकीर म्हणाले, 'या बसमार्गामुळे नारायणपूर व बालाजी मंदिर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची तसेच कापूरहोळ ते सासवड दरम्यानच्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होईल'. झेंडे म्हणाले, 'या बसमार्गावर ३ बसद्वारे बससेवा उपलब्ध आहे. सर्पोद्यानपासून दर तासाला बस उपलब्ध असेल. सर्पोद्यान ते सासवड १२ खेपा व कापूरहोळ ते सासवड १६ खेपा होणार आहेत. सर्पोद्यान ते सासवड पहिली बस सकाळी ५ वाजता तर शेवटची बस संध्याकाळी साडेआठ वाजता आहे. तसेच सासवड ते सर्पोद्यान पहिली बस सकाळी साडेनऊ वाजता तर शेवटची बस संध्याकाळी साडेसात वाजात आहे. सासवड ते कापूरहोळ पहिली बस सकाळी साडेसहा वाजता तर शेवटची बस संध्याकाळी साडेसात वाजता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT