Crime News esakal
पुणे

Pune Crime : कात्रजमध्ये महिलेसह दोघांवर हत्याराने वार; आरोपीला अटक

जुन्या भांडणातून एका तरुणाने महिलेसह दोघांवर हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कात्रज येथील संतोषनगर परिसरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जुन्या भांडणातून एका तरुणाने महिलेसह दोघांवर हत्याराने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कात्रज येथील संतोषनगर परिसरात घडली. या गुन्ह्यातील आरोपीला उत्तर प्रदेश येथे पळून जाताना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

प्रदीपसिंग बुट्टे नारिया (वय ३०, रा. केदारीनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील सिहारी-दाऊदपुर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलीसह संतोषनगर परिसरात राहतात. त्यांचा नातेवाईक प्रदीपकुमार नारिया हा १५ जुलै रोजी त्यांच्या घरी गेला. त्याने जुन्या भांडणातून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला शिवीगाळ करुन हत्याराने वार करून जखमी केले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी प्रदीपसिंग नारिया हा मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील आहे. त्यामुळे तो तिकडे पळून जाण्याची शक्यता होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार आणि तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT