पुणे

कवठ्याच्या मातीतील एक अदृश्य दीपस्तंभ

CD

कवठ्याच्या मातीतील एक अदृश्य दीपस्तंभ

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, धुरंधर राजकारणी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या कार्य -कर्तृत्वामुळे कवठे गावाचे नाव राज्याच्या देशाच्या राजकीय नकाशावर अधोरेखित झाले. या गावाला स्वातंत्र्य चळवळीवेळी आणि नंतर अनेक थोरामोठ्यांनी भेटी दिल्या. यात महात्मा गांधी, नेताजी बोस, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लुई फिशर, साने गुरुजी, इंदिरा गांधी आदीची नावे ऐकली, की आपली छाती दडपून जाते. या गावाला इतकी मोठी माणसं भेट देण्याचे भाग्य लाभले. यावरून या गावच्या मातीतच काहीतरी विलक्षण जादू असणार.
आबासाहेब वीरांच्या विचारांनी स्वातंत्र्यपूर्व काळात प्रेरित झालेले जसे अनेक जण होते, तसे त्यांच्या सुराज्याच्या कल्पनेने प्रेरित झालेलेही अनेक होते. माधवराव डेरे- बाबाही असेच एक युवक. आबासाहेबांचा प्रभाव एवढा होता की त्यांच्या गावचा त्यांच्या समवेत गाव कारभारात असणारा कार्यकर्ता तोलामो लाचा मानला जात असे. युवा अवस्थेत असतानाच माधवराव बाबांनी तरुणांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला. गावातील तरुणांच्या उपजत कलागुणांना संधी मिळावी म्हणून विश्वशांती कलावृंद निर्माण केला. अल्पावधीतच या मंडळातील युवकांच्या अभिनय कौशल्याने कवठ्याचे नाव सर्वतोमुखी झाले. दरम्यानच्या काळात बाबांना शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. यवत (जि. पुणे) येथे ते रुजू झाले. तेथेही पाच- सहा वर्षांच्या काळात आपल्या कामाचा त्यांनी ठसा उमटवला. आबासाहेब वीर यांना या युवकाची गावात उणीव भासू लागली. त्यांनी बाबांना बा. ना. चिटणीस सरांकडे शिफारस करून यशवंत शिक्षण संस्थेत रुजू करून घेतले. तिथूनच खऱ्या अर्थाने बाबांच्या समाजकारणाला सुरुवात झाली. मूळचे शिक्षक त्यात कार्यकर्त्याचा पिंड असणाऱ्या बाबांच्या भोवती अल्पावधीत वलय निर्माण झाले. सामाजिक कामासाठी शिवाजी मंडळ स्थापन झाले. गावात छोटे-मोठे सार्वजनिक उपक्रम सुरू झाले. गावच्या छोट्या मोठ्या विकासकामांसाठी बाबांची धडपड वाढू लागली. शिक्षक म्हणून नोकरी करीत त्यांनी गावच्या राजकारण- समाजकारणात सक्रिय सहभाग नोंदवायला सुरुवात केली. याच काळात सरपंच म्हणून काम करण्याची संधी त्यांना चालून आली; परंतु ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ दादांच्या ज्येष्ठत्वाचा विचार करून आणि गावात एकोपा राहण्यासाठी त्यांनी दादांना ती संधी दिली. पुढे यथावकाश बाबांना उपसरपंच, सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गावात सुरेश वीर, हंबीर डेरे, शंकर पाटील, बाबूराव पाटील, धोंडीअप्पा, मारुती आप्पा पोळ, हणमंत डेरे, बाळासाहेब वीर, लालासाहेब खुडे, राजेंद्रबापू पोळ, संभाजी ससाणे, ज्योतिराम पाटील, कृष्णराव पाटील, शिवाजी सातपुते, शिवाजी डेरे, जगन्नाथ डेरे, तानाजी डेरे, सदाशिव डेरे, प्रभाकर हावरे, नरहरी अण्णा, बाबूराव हरिबा डेरे, संभाजीराव करपे, वसंतराव राऊत गुरुजी, अण्णा मास्तर, मुल्ला मास्तर, आनंदराव डेरे, भिकन शेख, कांबळे गुरुजी, बबनराव चव्हाण, आनंदराव डेरे यांच्या पिढीतील आणि समकालीन सहकाऱ्यांबरोबर त्यांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न केले. प्रत्येकाच्या सुखदुःखात आपला सक्रिय सहभाग नोंदवला. आबासाहेबांबरोबर कामाचा आनंद घेत त्यांच्या माघारी आजतागायत कार्यरत राहणारे अगदीच कमी लोक गावात आता उरलेत. बाबा या दोन पिढ्यांना जोडणारे महत्त्वाचे कार्यकर्ता, दुवा होते. मूळचेच अभिनयाचे अंग असणारे बाबा इतिहासासारखा विषय माध्यमिक स्तरावर किती रंगून शिकवत असतील. आजही त्यांच्या या अध्यापन कौशल्याची आठवण ठेवणारे विद्यार्थी भेटतात. बाबांनी राजकारण केले तर ते केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित आणि तेही समन्वयाला प्राधान्य देत. नंतर साऱ्या गावाचे ते आणि सारे गाव त्यांचे व्हायचे. स्वच्छ शुभ्र पायजमा, पंख्याचा सदरा, अशी वेशभूषा, मध्यम उंची लाभलेले हे व्यक्तिमत्त्व साऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे. प्रचंड आत्मविश्वास अंगी असल्याने कुठल्याही बाबीत पुढाकार घेऊन ती मार्गी लावण्यासाठीचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे. निवडणुकीच्या राजकारणाकडे ते फारसे वळले नाहीत. वळले असते तर तिथे त्यांनी निश्चितच आपली चमक दाखवली असती आणि गावही त्यांच्याबरोबर उभे राहिले असते; परंतु त्यांनी संस्थात्मक- रचनात्मक कामावर भर दिला. किसन वीर यांच्या स्मृत्यर्थ त्यांनी किसन वीर शिक्षण संस्था स्थापन करून एक माध्यमिक विद्यालय चालवण्याचा प्रयत्न केला. किसन वीर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या मैत्रीचे स्मरण म्हणून भव्य प्रवेशद्वार त्यांनी उभे केले, अशी अनेक कामे सांगता येतील. गावच्या विकासकामांसाठी लोकवर्गणी गोळा करताना त्यांना कधी कमीपणा वाटला नाही.
गौतम बुद्धाच्या चरित्रात एक गोष्ट आहे. गाव फिरूनही एका भिक्षुकाला भिक्षा मिळत नाही. शेवटी एक घर राहिलेले. त्या घरात तो भिक्षा मागतो. घरातील महिला त्याला थांब म्हणून सांगते. डब्यात पाहते तर एक भाकरी कशीबशी होईल, एवढेच पीठ असते. ती महिला तेवढी एक भाकर तयार करते. अर्धी त्या भिक्षुकाला देते आणि अर्धी स्वतः खाते. तो भिक्षुक ही सारी घटना बुद्धाला गदगदून सांगतो तेव्हा बुद्ध म्हणतो, असे काही अदृश खांब आहेत त्यांनीच हे सारे आकाश तोलून धरले आहे. म्हणूनच एवढे सारे अनर्थ घडले, तरी हे आकाश कोसळले नाही. बाबा मला त्या अदृश्य खांबासारखे वाटत आले. त्यांच्यासारख्या असंख्य खांबामुळेच कवठ्याचे आजवरचे आकाश सावरले गेले आहे. तशी शहाणीव असणारे कार्यकर्त्यांचा पिंड असणारे. लहानात कधी मोठे व मोठ्यात कधीच लहान न दिसणारे बाबा. आईच्या पोटात गर्भावस्थेत असतानाच वडिलांचा मृत्यू ओढवल्याने पितृमुखालाही पारखे झालेले बाबा अनेकांना पुढील काळात मात्र पितृस्थानी भासले. आमच्या गावासाठी, आप्तेष्टासाठी, कुटुंबासाठी सदैव लखलखत नव्हे तर ते तेवत राहिले, अशी माणसं गावाला श्रीमंत- समृद्ध करीत असतात. गावाला असेच श्रीमंत - समृद्ध ठेवण्यातच बाबांना खरी श्रद्धांजली असेल. मागून चालत येणारी पिढी हे काम करेल, ही अशा मनात बाळगून बाबांना माझी ही आदरांजली अर्पण करतो.
- अंकुश डेरे
स्मरण गंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT