पुणे

कवठे येथे पिक अप अडवून सोने लुटले

CD

कवठेजवळ सशस्त्र दरोडा

एक किलो सोने लुटले; आठ जणांकडून कोयत्याचा धाक

भुईंज, ता. १६ : पुण्याहून सातारा, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या खासगी कुरिअर कंपनीच्या वाहनावर कवठेजवळ महामार्गावरील उड्डाणपुलावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. आज पहाटे सहाच्या सुमारास तीन दुचाकीवरून आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी कोयत्यासह शस्त्रांचा धाक दाखवून वाहनातील सोन्याचे दागिने असलेला एक बॉक्स लंपास केला. या बॉक्समध्ये तब्बल एक किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर भुईंज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या कुरिअर कंपनीच्या वाहनाचा (एमएच ०९ एफएल ५४२३) दरोडेखोरांनी पाठलाग केला. कवठे गावाजवळ महामार्गावरील उड्डाणपुलावर वाहन आले असता तीन दुचाक्यांवरून आलेल्या सात ते आठ जणांनी वाहनाला गाठले. त्यानंतर शस्त्रांचा धाक दाखवून वाहनाच्या मागील बाजूचा दरवाजा उघडला आणि आतील एक बॉक्स ताब्यात घेतला. बॉक्स घेऊन दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक विजय पवार यांना धक्का बसला. त्यांनी घटनेची माहिती भुईंज पोलिसांना देऊन तक्रार दाखल केली. संबंधित बॉक्समध्ये एक किलो सोन्याचे दागिने असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भुईंज पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. महामार्गावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेत लुटलेले सोने नेमके कोणत्या कंपनीचे आहे, संबंधित कुरिअर कंपनी कोणती आहे आणि सोन्याची वाहतूक कोणत्या कारणासाठी केली जात होती? याबाबत पोलिसांकडून गोपनीयता पाळण्यात येत आहे.
दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक विपुल सावंत व सुनील साळुंखे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रकरणाच्या तपासासाठी भुईंज पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलिस उपअधीक्षक पूनम झगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस उपनिरीक्षक आकाश मोरे आणि सूरज शिंदे यांच्यासह पोलिसांची पथके रात्री उशिरापर्यंत तपास करीत होती.

शोधासाठी पथके रवाना
------------
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी मिळालेली माहिती आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT