पुणे

‘काव्य पुष्पांजली’चे पुण्यात प्रकाशन

CD

हिर्डोशी, ता. २ : इंगवली (ता. भोर) येथील बबन हिरामण मोहिते यांनी वयाच्या ८०व्या वर्षी आपल्या लेखणीतून तयार केलेल्या ‘काव्य पुष्पांजली’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवारी (ता. १) पुण्यात एका कार्यक्रमात पार पडले.
या काव्यसंग्रहात मोहिते यांनी त्यांच्या मनातील भावना, विचार आणि आयुष्यातील अनुभव कवितेच्या माध्यमातून मांडले आहेत.
या संग्रहात स्वलिखित तेरा कविता प्रसिद्ध केल्या आहेत. मुंबई येथील वेलवेट कविशा पब्लिकेशन व झेप सामाजिक संस्था यांच्यामार्फत मोफत प्रकाशन केले आहे. यासाठी लेखिका रश्मी टांकसाळकर यांचे सहकार्य लाभले. प्रकाशन प्रसंगी प्रकाशिका वर्षा ठुकरुल, ॲड. मिताली कुवळेकर तसेच मोहिते यांचे कुटुंब उपस्थित होते. मोहिते हे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. या वयातही त्यांनी साहित्यप्रवास पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर ठेवला असल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. हा कवितासंग्रह म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर एका अनुभवसमृद्ध आयुष्याचा भावस्पर्शी शब्दप्रवास आहे. सगे-सोयरे, नातीगोती, माणसांचा सहवास, सुख-दुःखाचे प्रसंग, अनुभव, आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या आणि प्रसंगांच्या आठवणींना कवितेच्या रूपाने जपले आहे असे टांकसाळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी धक्का... ज्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये खरी गरज, तोच मुकणार; नेमकं काय घडलं?

'नटरंग'नंतर १७ वर्षांनी 'ती' येतेय; रवी जाधव यांच्या 'फुलवरा' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी थिएटरमध्ये धडकणार

Latest Marathi News Live Update : गोंदियात 5 हजार 152 झाडांची होणार कत्तल?

२००MP कॅमेरा ते १०,०००mAh बॅटरी! नोव्हेंबरमध्ये स्मार्टफोनचा मोठा धमाका; पाहा मार्केटमध्ये कोणते नवीन फोन येणार

CSK: १४.२ कोटी खर्चूनही CSK देणार खेळाडूला निरोप? स्टार ऑलराऊंडरसह विकेटकिपरवरही टांगती तलवार; कोण आहेत हे खेळाडू?

SCROLL FOR NEXT