पुणे

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ

CD

कवठे येमाई, ता. २८ : शिरूर तालुक्याच्या बेट भागातील सविंदणे, कवठे येमाई परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, दोन दिवसांत तीन जनावरे हल्ला करून ठार केली आहेत. त्यातच दिवसाढवळ्या शेतात काम करतानाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कवठे येमाई येथील शेतकरी भानुदास सखाराम रोहिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या मेंढीवर मंगळवारी (ता. २५) रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. त्याच दिवशी सविंदणे येथील किठेवस्ती परिसरात दीपक विलास किठे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. शेळीला जवळील शेतात ओढून नेऊन तिचा फडशा पाडला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी (ता. २६) रात्रीच्या सुमारास सविंदणे येथील लंघेमळा परिसरात बिबट्याने खंडू कारभारी लंघे यांच्या गोठ्यात शिरून वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनांची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक नारायण राठोड व वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला. वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी, तसेच बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: रक्षाबंधनाच्या तोंडावर साखरेचे दर घसरले! किरकोळ बाजारातही मिळणार फायदा; सरकारच्या नव्या कोटा पद्धतीचा काय परिणाम होणार?

Bolero Bike Accident : टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

Pune Traffic Update: पुण्यातील 'ट्रॅफिक'बाबत मोठी अपडेट! शहरातील 'मिसिंग रोड'च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात अजून किती भारतीय नागरिक बेपत्ता? MEA कडून मोठं अपडेट समोर; संपूर्ण आकडेवारी सांगितली!

Sonal Dinusha Story: रक्षाबंधन स्पेशल! बहिणीने उधार पैसे घेऊन दिली होती पहिली बॅट; आज त्याच भावाने भारताविरुद्ध गाजवलं नाव

SCROLL FOR NEXT