wine sakal
पुणे

कडेगाव तहसिल कार्यालयावर दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

पोलीस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रकार उघडकीस : तालुक्यात एकच खळबळ

संतोष कणसे

कडेगाव : येथील तहसिल कार्यालयावर देशी-विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आज आढळून आला.या धक्कादायक प्रकाराने महसूल विभागासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आज येथील तहसील कार्यालयावर कडेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे शोले स्टाईल आंदोलन सुरु होते.यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पोलीसांच्या साक्षीने हा प्रकार उघडकीस आला.

कडेगाव तहसिल कार्यालय म्हणजे तालुक्याचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे.येथून तालुक्याचे सर्व प्रशासकीय कामकाज चालते. तर सध्या तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू तस्करीमुळे येथील तहसिल कार्यालय चांगलेच चर्चेत आले आहे.त्यातच

आता कार्यालयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पोलिसांच्या साक्षीने देशी व विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे.या प्रकाराने सर्वत्र एकच खळबळ उडाल्याने आंदोलनस्थळी असलेले प्रभारी नायब तहसीलदार जे.एन.लाड यांनी येथील दारुच्या बाटल्या हटवण्याचा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

तर तहसिल कार्यालयावर देशी-विदेशी दारुच्या बाटल्या कुठून आल्या याबाबत उपस्थितासह तालुक्यातील नागरिकांतून तर्क- वितर्काना चांगलेच उधाण आले आहे.

तहसिल कार्यालयावर दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.त्या तेथून लगेच हटवण्यात आल्या आहेत.परंतु त्या येथे कशा आल्या,कोणी ठेवल्या याबाबत चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.

- जे.एन.लाड,प्रभारी नायब तहसिलदार कडेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : गिल-विराट स्वस्तात बाद, पण रोहित शर्माने केला वर्ल्ड रेकॉर्ड; सचिन तेंडुलकरला टाकले मागे

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : पोटच्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; ३५ वर्षीय वडिलांना अटक

SCROLL FOR NEXT