पुणे

चौफुला कालव्यावर मोठा पूल करण्याची मागणी

CD

केडगाव, ता. २९ : चौफुला (ता. दौंड) येथील नवीन मुठा उजव्या कालव्यावर मोठा पूल बांधावा आणि पडवी-सुपे दरम्यान घाट रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे मंत्रालयात केली.
केडगाव-सुपे राज्य मार्ग हा दौंड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा आहे. या मार्गावर बोरीपार्धी-चौफुला येथे नवीन मुठा उजव्या कालव्यावर सध्या ३ गाळ्यांचा पूल आहे. तो अतिशय अरुंद असल्याने दोन जड वाहने एकाच वेळी त्यावरून जाऊ शकत नाहीत. परिणामी येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते आणि अपघात घडतात. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हडपसर ते यवत उन्नत महामार्ग प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू झाल्यानंतर महामार्गावरील सर्व वाहतूक या राज्य मार्गावर वळवली जाणार आहे. त्यामुळे या पुलाचे रुंदीकरण करून येथे नवीन मोठा पूल उभारणे गरजेचे असल्याचे आमदार कुल यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याच मार्गावरील पडवी ते सुपे दरम्यानच्या घाटात तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणे आहेत. वळणांवर रस्त्याचा आवश्यक उतार पुरेसा नाही. त्यामुळे चढ चढताना जड वाहने मागे घसरतात. काही वाहने विरुद्ध लेनमध्ये जाऊन चढण्याचा प्रयत्न करतात आणि समोरासमोर अपघात होतात. तीव्र वळणांवर चालकांचा ताबा सुटून वाहने थेट दरीत कोसळल्याच्या शेकडो घटना येथे घडल्या आहेत. त्यामुळे आवश्यक भूसंपादन आणि घाट कटिंग करून या रस्त्याची रचना आणि चढाची तीव्रता सुधारण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आमदार कुल यांनी केली.
या दोन्ही मागण्यांबाबत मंत्री भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

IPL 2027 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ; लसिथ मलिंगासह दोन भरवशाच्या सहकाऱ्यांनी सोडली साथ, हार्दिक पांड्याचं काय?

डॉक्टरांना घरी पाठवूया? आधी काव्याची कॉलेजमध्ये, आता सायलीची 'या' ठिकाणी होणार डिलिव्हरी; 'ठरलं तर मग'च्या ट्विस्टवर चाहते नाराज

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

SCROLL FOR NEXT