lockdown 
पुणे

दो गज की दूरी रखो... जुन्नरच्या नागरिकांना सूचना

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : पुणे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे जुन्नर नगर पालिका क्षेत्रात 'दो गज की दूरी‘ राखली जाईल, अशी दक्षता घेण्याची सूचना मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी नागरिकांना केली आहे. 

नागरिकांनी तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडावे, दहा वर्षापर्यंतची मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी येण्यास बंदी, चारचाकी वाहनात चालकाशिवाय दोन व्यक्तीस बसण्यास परवानगी असेल, दुचाकीवर मागे बसता येणार नाही. अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत सर्व व्यक्तीच्या हालचालींसाठी प्रतिबंध करण्यात आला असल्याचे डॉ. कटाकर यांनी सांगितले. 

जुन्नरमधील किराणा दुकाने, दूध, फळे व भाजीपाला विक्री, मासे, मटण व चिकन विक्रीची दुकाने, दवाखाने व मेडिकल सेवा सुरू राहणार असून, पान टपरी, हॉटेल, लॉज, मिठाई, चहा, कापड, इलेक्ट्रॉनिक व अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या दुकानांना बंदी राहणार असल्याचेही डॉ. काटकर यांनी सांगितले.औद्योगिक उपक्रमांना व बांधकामांना सशर्त परवानगी असेल. दुकानदारांनी निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, ग्राहकांसाठी दुकानासमोर चौकोन आखणे व जमावबंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी कळविले आहे. 

दरम्यान, तिसऱ्या लॉक डॉउनमध्ये ग्रामीण भागात काही सवलती दिल्या असल्याने व जुन्नरला एकही कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याने खास बाब म्हणून सर्व दुकाने ठराविक काळासाठी उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

Petrol Diesel Stock Update : पेट्रोल डिझेल टंचाईवर अखेर पेट्रोलियम कंपन्यांनी केला खुलासा; साठ्याचेही सांगितलं गणित

Ashok Kharat Case Update : अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली, गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT