Rain 
पुणे

Pune Rains : पुणेकरांनो, रेनकोट, छत्री आज जवळ ठेवा कारण...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ८८ टक्के आहे. त्याच वेळी परतीचा पाऊस राज्याच्या उत्तर सीमेवर आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये शहर आणि परिसरात पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट तुमच्या जवळ ठेवा.

शहरात येत्या सोमवारी (ता. १४) आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. मंगळवारी (ता.१५) पाऊस विश्रांती घेईल. त्या दिवशी आकाश ढगाळ राहील; तर त्यानंतर बुधवारपासून (ता.१६) पुढील दोन दिवस पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

शहरात रविवारी दुपारनंतर आकाशात ढगांनी गर्दी केली. त्यानंतर विश्रांतवाडी आणि नगर रस्ता परिसरात पावसाच्या जोरदार सरी दुपारी एक वाजता पडू लागल्या. काही वेळानंतर या सरींनी विश्रांती घेतली; पण त्याच वेळी कोथरूड, पाषाण आणि वारजे परिसरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

ढगांच्या गडगटाटासह पावसाच्या सरी पडत होत्या. यात विश्रांतवाडी येथे पावसाला सर्वाधिक जोर होता; तर पाषाण, कोथरूड, सिंहगड रस्ता येथे पावसाच्या काही सरी पडल्या. दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडले होते. त्याच वेळी पावसाला सुरवात झाल्यामुळे पावसापासून संरक्षणासाठी मिळेल त्या ठिकाणी थांबलेले पुणेकर असे चित्र दिसत होते. 

कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सोसायट्यांमधून झालेले असते. रात्री पावसाची शक्‍यता असल्याने आयोजकांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांना रविवारी दुपारी पावसाला फटका बसला. तसेच, कोजागिरी पौर्णिमेच्या नियोजनात पावसामुळे ‘प्लॉन बी’वर जावे लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. अवघ्या दोन आठवड्यांवर दिवाळी आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT