qr1.jpg 
पुणे

पुण्यातील 'या' क्वारंटाईन केंद्रात कोरोना बाधित रुग्णांना ठेवण्यास विरोध

सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी (पुणे)  : खराडी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स मधील पुणे महानगरपालिकेच्या क्वारंटाइन केंद्रात कोरोना बाधित रुग्णांना ठेवण्यास परिसरातील गृहरचना संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून त्याविरोधात आज सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले. 

यावेळी माजी आमदार बापू पठारे, संतोष भरणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांनी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त राजेश बनकर यांच्याशी चर्चा करून मागण्या मांडल्या. बनकर यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. 

संतोष भरणे म्हणाले, "विलगीकरणासाठी रक्षकनगर गोल्ड शेजारी असलेल्या स्पोर्टस कॉम्प्लेक्‍समध्ये परवानगी दिली. परंतु, आता येथे कोरोना बाधित रुग्णांना ठेवण्याचा घाट घातला आहे. यास रक्षक गोल्ड सोसायटी, तनिष्क सोसायटी, गुलमोहर सोसायटीचा विरोध आहे. जर दोन दिवसात योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही सर्व सदस्य स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स गेटवर बसून आंदोलन करू.' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

माजी आमदार बापू पठारे म्हणाले, "स्पोर्टस कॉम्प्लेक्‍सच्या इमारतीला काचा नाही, येथे योग्य सुविधा नाहीत, आसपास सुमारे पाच हजार लोक राहतात. त्यांचा जीव का धोक्‍यात घालायचा. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण का ठेवत नाही. विलगीकरण कक्ष करण्यास कुठलाही विरोध नाही. परंतु कोरोना बाधित रुग्ण ठेवायला आमचा विरोध आहे. त्यांना इतरत्र हॉस्पिटलमध्ये ठेवावे.' 
कोरोना बाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये पाठवायचा निर्णय दोन दिवसात घेऊ, असे आश्वासन सहाय्यक आयुक्त राजेश बनकर यांनी दिल्याचे पठारे यांनी सांगितले. याविषयी बनकर यांच्याशी अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT