पुणे

केळघर घाटात अपघात

CD

मालट्रक अपघातात
चालक जागीच ठार

केळघर घाटात घडली दुर्घटना

केळघर, ता. २९ : केळघर घाटात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मुकवली माची हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्‍ये ट्रकचालकाचा जागीच मृत्‍यू झाला.
मेढा पोलिसांच्‍या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रोहा येथून साताऱ्याकडे माल वाहतूक करणारा ट्रक (केए २८ सीए ५५६८) चालकाचे नियंत्रण सुटून अवघड वळणावरून डोंगरास धडकला. यामध्‍ये चालक आजिनाथ नागरगोजे (वय ३२, रा. बीड) हे जागीच ठार झाले. हा ट्रक केमिकल पावडर घेऊन येत होता. घटनेनंतर मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स, रेंगडी व मुकवली माची येथील ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रकमधील चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अपघात एवढा भीषण होता, की ट्रकची पुढील बाजू पूर्णपणे दबली होती. केबिनमध्ये चालक अडकून पडून तेथेच त्‍यांचा मृत्यू झाला. केळघर घाटात नागमोडी व अवघड वळणे असून, वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

फोटो :.............01355
मुकवली माची : अपघातग्रस्त माल वाहतूक करणाऱ्या ट्रकची झालेली अवस्था.
....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

नवीन कर्णधार? वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री! LA Olympics अन् ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२८ साठी कसा असेल भारताचा संघ? बरेच पर्याय उपलब्ध

Naman Awards 2026: स्मृती मानधना सलग ५ व्यांदा ठरली सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; BCCI ने जाहीर केली पुरस्कारांची यादी

हम साथ साथ है फेम अभिनेत्रीचा सख्ख्या बहिणीनेच केला विश्वासघात ! नवरा तर पळवलाच पण संपत्तीही हडपली

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

SCROLL FOR NEXT