atul deulgaonkar sakal
पुणे

केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक अतुल देऊळगावकर यांना जाहीर

पाच हजार रूपये, सन्मानपत्र असे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाचे स्वरूप आहे. १४ ऑक्टोबर ही न. चिं. केळकर यांची पुण्यतिथी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाच हजार रूपये, सन्मानपत्र असे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाचे स्वरूप आहे. १४ ऑक्टोबर ही न. चिं. केळकर यांची पुण्यतिथी आहे.

पुणे - साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या स्मरणार्थ केसरी-मराठा संस्थेतर्फे दिले जाणारे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक यंदा पर्यावरण अभ्यासक व लेखक अतुल देऊळगावकर यांच्या ‘पृथ्वीचे आख्यान’ या पुस्तकाला जाहीर झाले आहे. ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी या पारितोषिकाची घोषणा केली.

पाच हजार रूपये, सन्मानपत्र असे केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिकाचे स्वरूप आहे. १४ ऑक्टोबर ही न. चिं. केळकर यांची पुण्यतिथी आहे. दरवर्षी केळकर यांच्या पुण्यतिथीदिनी पारितोषिकाचे वितरण केले जाते. मात्र यावेळी देऊळगावकर हे परदेशात आहेत. त्यामुळे पारितोषिक वितरणाचा तपशील नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

देऊळगावकर यांनी हवामान व पर्यावरणविषयक विविध जागतिक परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे. पर्यावरण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, विकास, विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांवर ते विविध माध्यमांतून विचार मांडत आहेत. त्यांची ‘ग्रेटाची हाक : तुम्हाला ऐकू येतेय ना’, ‘डळमळले भूमंडळ’, ‘बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची’ आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. देऊळगावकर यांना पां. वा. गाडगीळ पुरस्कार, राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार, डॉ. राम आपटे प्रबोधन पुरस्कार, सर्वोत्तम पर्यावरणीय पत्रकार पुरस्कार, अनिता अवचट फाऊंडेशनचा संघर्ष सन्मान, किर्लोस्कर वसुंधरा पर्यावरण पत्रकार पुरस्कार आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT