पुणे

शेतमजुरांना डांबून ठेऊन दिवसरात्र काम करून घेतले;बनकरफाटा येथे आंदोलन

जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी संबंधित बागायतदारावर आळेफाटा येथे गुन्हा दाखल करायला लावला

दत्ता म्हसकर

जुन्नर : आदिवासी भागातील गोद्रे ता.जुन्नर येथील दोन मजुरांना आळेफाटा येथून मजुरी देण्याच्या बहाण्याने निघोज ता.पारनेर येथे बळजबरीने नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या कडून दिवस-रात्र काम करून घेतले. एका खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले होते. या मजुरांकडून वीस दिवस काम करून घेऊन त्यांचा छळ करण्यात आला त्यांना मजुरीचे पैसे सुद्धा दिले गेले नाहीत.

त्यांना मारहाण देखील करण्यात आलीया घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी संबंधित बागायतदारावर आळेफाटा येथे गुन्हा दाखल करायला लावला. परंतु योग्य कलमे लावून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आरोपीला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आज ता.१५ रोजी लांडे यांच्या नेतृत्वाखाली गोद्रे गावातील ग्रामस्थ व आदिवासी भागातील सर्व मजूरांनी बनकर फाटा येथे कल्याण-नगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी अमोल लांडे , माऊली विरणक, रामा दुला भालचिम , बाळू जोशी, लक्ष्मण दिघे, सोपान मडके , दिनेश उतळे , सुनील मेमाणे , मनोहर ससाने आदी उपस्थित होते.

ज्या मजुरांवर अन्याय झाला आहे त्यांनी मुंडन करून घेऊन छळ करणाऱ्या त्या बागायतदारांची दशक्रिया आंदोलनाच्या वेळी घातली. मजुरांना न्याय मिळावा हीच भावना सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT