hirkani tachini sakal
पुणे

Pune News : केरळमधून अनोख्या ‘हिरकणी टाचणी’चा शोध

साधारणपणे गवताळ भागात भिरभिरणाऱ्या चतुर कीटकाच्या प्रवर्गातील, पण वेगळ्या शारीरिक रचनेमुळे संबंधित किटक ‘टाचणी’ या मराठी नावाने ओळखला जातो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केरळमधील पोनमुडी (त्रिवेंद्रम) येथील दुर्गम डोंगराळ भागात ‘चतुर’ कीटकाच्या प्रवर्गातील, परंतु वेगळ्या अशा ‘टाचणी’ (फायलोनेउरा रुपेस्ट्रिस) कीटकाच्या प्रवर्गातील ‘हिरकणी टाचणी’ (क्लिफसाईड बांबूटेल) या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. अतिशय दुर्गम भागातील पर्वतातून उगम पावणाऱ्या झऱ्यांच्या परिसरात या कीटकाचा अधिवास आढळला आहे.

साधारणपणे गवताळ भागात भिरभिरणाऱ्या चतुर कीटकाच्या प्रवर्गातील, पण वेगळ्या शारीरिक रचनेमुळे संबंधित किटक ‘टाचणी’ या मराठी नावाने ओळखला जातो. या टाचणी कीटकाचे इंग्रजीमध्ये ‘क्लिफसाईड बांबूटेल’ आणि मराठीत ‘हिरकणी टाचणी’ असे नामकरण केले आहे. हा किटक टाचणी प्रवर्गात मोडणारा असून त्याचे शास्त्रीय नाव ‘फायलोनेउरा रुपेस्ट्रिस’ हे आहे.

साधारणत: डोंगर-दऱ्यांच्या भागात झऱ्यांच्या भागात आढळून येणारा किटक आहे. पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पंकज कोपर्डे यांच्यासह विवेक चंद्रन आणि सुबीन जोस (ख्राईस्ट कॉलेज, केरळ), रेजी चंद्रन (सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज, केरळ) आणि सूरज पलोदे (शोला नेचर सोसायटी, केरळ) या संशोधकांनी केरळमधील पोनमुडी पर्वताच्या दुर्गम भागात ही नवी प्रजाती शोधली आहे.

या संदर्भातील शोधनिबंध अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओडोनाटोलॉजी’ संशोधनपर मासिकामध्ये प्रकाशित झाला आहे. चंद्रन म्हणाले, ‘नव्याने सापडलेल्या प्रजातीला विशिष्ट सूक्ष्म निवासस्थानाची आवश्यकता आहे. त्यांच्या अधिवासातील बदल आणि जल प्रदूषणामुळे अशा प्रजातींवर परिणाम होऊ शकतो. कीटकांची संख्या जागतिक स्तरावर कमी होत आहे.’

प्रजातीला ‘बांबूटेल’ का म्हणतात?

‘फायलोनेउरा’ या प्रजातीतील टाचणी कीटकांना ‘बांबूटेल’ असे म्हटले जाते. बांबूवर असणाऱ्या खुणांप्रमाणे कीटकाच्या शेपटीवर खुणा असतात, म्हणून त्याला ‘बांबूटेल’ असे संबोधले जाते.

‘हिरकणी टोचणी’चे वैशिष्ट्य

  • टाचणीसारखी शारीरिक रचना असणारा निळ्या रंगाचा कीटक

  • अन्न : उपद्रवी छोटे-छोटे किटक

  • दुर्गम भागातील पर्यावरणीय परिसंस्था संतुलित असल्याचे दर्शवितो

  • अधिवास : पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांच्या परिसरात आढळतो. झऱ्यांच्याकडेला असणाऱ्या खडकांवरील शेवाळावर अंडी घालतो.

आणखी प्रजातीची भर

फायलोनेउरा प्रवर्गातील हिरकणी टाचणी या प्रजातीत आजवर मिरिस्टीका बांबूटेल (फायलोनेउरा वेस्टरमनी) या एकाच प्रजातीची नोंद होती. हिरकणी टाचणीच्या शोधाने आता या प्रजातीत आणखी एका प्रजातीची भर पडली आहे. सूक्ष्म अधिवास या टाचणीच्या प्रजननासाठी, संवर्धनासाठी महत्त्वाचे आहेत. हिरकणी टाचणीसारखेच कित्येक कीटक पश्चिम घाटात आढळून येतात. सूक्ष्म अधिवासात राहूनही हे कीटक परिसंस्था संतुलनाचे काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT