पुणे

केरळम डेस्क आणणार गुंतवणूक

CD

हेड
‘केरळम डेस्क’ आणणार गुंतवणूक

सबहेड
राज्य सरकारचा उपक्रम; मुख्यमंत्री सतीशन यांची घोषणा

तिरुअनंतपुरम, ता.३ (पीटीआय) ः ‘‘केरळम सरकारने राज्यामध्ये परकी गुंतवणूक आकृष्ट करण्यासाठी पाच जागतिक शहरांमध्ये ‘केरळम डेस्क’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून परदेशातील केरळी नागरिकांसोबतच्या संबंधांना बळकटी देण्यात येईल,’’ असे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी आज जाहीर केले आहे. सतीशन यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर नोंदविलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे, की दुबई, लंडन, न्यूयॉर्क, सिंगापूर आणि टोकियो या शहरांमध्ये हे डेस्क उभारण्यात येतील. यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा आखण्यात आला आहे. यासाठी शून्य खर्च प्रारूपाचा अवलंब करण्यात आला आहे. परदेशस्थ केरळी नागरिकांशी असलेले संबंध यामाध्यमातून आणखी दृढ केले जातील. त्यांच्या माध्यमातून राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान राज्याच्या उद्योग विभागाने ३० सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

- या डेस्कच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रामध्ये नेमक्या काय संधी आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. संबंधित शहरामध्ये सध्या गुंतवणुकीचा नेमका ट्रेंड काय आहे? हे लक्षात घेऊन राज्य सरकारला तसे धोरण आखण्यास मदत होऊ शकेल

- या नव्या उपक्रमामुळे राज्यावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण येणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले. ज्या शहरामध्ये हा डेस्क उभारण्यात येईल त्या प्रत्येक ठिकाणी त्याची सूत्रे ही स्थानिक केरळी नागरिकांकडे सोपविण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

SCROLL FOR NEXT