पुणे

नीट घोटाळा

CD

केरळमधील विद्यार्थ्याने
पाठवली होती प्रश्नपत्रिका

‘नीट’ पेपरफुटी प्रकरण : राजस्थानच्या मित्रांना दिला ‘गेस पेपर’

जयपूर, ता. १३ (पीटीआय) : नीट-यूजी २०२६ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांशी साधर्म्य असलेली एक संभाव्य प्रश्नपत्रिका (गेस पेपर) केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या राजस्थानमधील सीकर येथील एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांना आणि एका वसतिगृह चालकाला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. राजस्थानच्या विशेष कृती दलाच्या (एसओजी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

‘एसओजी’चे महानिरीक्षक अजय पाल लांबा यांनी सांगितले, की संबंधित विद्यार्थ्याला हे साहित्य प्रथम त्याच्या एका मित्राकडून मिळाले होते, त्यानंतर त्याने ते सीकरमधील इतरांना पाठवले. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेपूर्वी हे दस्तऐवज अनेक ‘कोचिंग क्लास’मधील विद्यार्थ्यांपर्यंत आणि नंतर जयपूर व आसपासच्या परिसरातील उमेदवारांपर्यंत पोहोचले. अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केरळमधील या विद्यार्थ्याने ही संभाव्य प्रश्नपत्रिका सीकरमधील एका वसतिगृह चालकाला आणि त्याच्या काही मित्रांना पाठवली होती. वसतिगृह चालकाने ही प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरू शकते, असे सांगून तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली होती. मात्र, नंतर याच वसतिगृह चालकाने स्थानिक पोलिसांना या संभाव्य प्रश्नपत्रिकेबाबत माहिती दिली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नसंच वाटल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.

हे साहित्य राजस्थानमध्ये पोहोचण्यापूर्वी हरियाणातील गुरूग्राम येथील एका व्यक्तीमार्फत आल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्याच्या अफवांची दखल घेत सीकर, झुंझुनू, अलवर, जयपूर शहर, जयपूर ग्रामीण पोलीस आणि ‘एसओजी’च्या संयुक्त पथकांनी १५० हून अधिक उमेदवार, त्यांचे मित्र आणि पालकांची चौकशी केली. तपासात असे समोर आले, की परीक्षा सुरू होण्यापूर्वीच ही प्रश्नपत्रिका राजस्थानमधील काही व्यक्तींपर्यंत पोहोचली होती. लांबा यांनी सांगितले, की हे निष्कर्ष ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ला (एनटीए) कळवण्यात आले, त्यानंतर केंद्र सरकारने ‘नीट’ रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक मंगळवारी रात्री उशिरा ‘एसओजी’ कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान गोळा केलेले जबाब आणि पुरावे सीबीआयकडे सोपवण्यात आले आहेत. संघटित जाळ्याचा भाग म्हणून काम केल्याच्या संशयावरून अनेक जण रडारवर असून त्यांची चौकशी सुरू आहे. २४ हून अधिक संशयितांना ‘सीबीआय’च्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कारवाई तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांवर अवलंबून असेल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चौकशी करण्यात आलेले बहुतेक संशयित एक तर ‘नीट’चे परीक्षार्थी आहेत किंवा परीक्षार्थींशी थेट संबंधित आहेत.

तपास करणाऱ्यांना असेही आढळले, की प्रसारित केलेल्या ‘पीडीएफ फाईल’मध्ये रसायनशास्त्राचे सुमारे ४५ आणि जीवशास्त्राचे ९० प्रश्न उत्तरांसह होते, जे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळत होते. ‘प्रायव्हेट माफिया’ नावाच्या ‘सोशल ग्रुप’मध्ये ही ‘पासवर्ड’संरक्षित ‘पीडीएफ’ प्रसारित करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत ‘कोचिंग क्लास, खासगी शिक्षण संस्थांची कोणतीही थेट भूमिका समोर आलेली नाही. परीक्षेच्या रात्री ८ मे रोजी एडीजी विशाल बन्सल आणि लांबा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूळ प्रश्नपत्रिकेशी या संभाव्य प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली. अनेक प्रश्न जुळत असल्याचे आढळल्यानंतर ‘एसओजी’ने तातडीने कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले असून, ‘राजस्थान एसओजी’ने दिलेल्या माहितीवरून नाशिक पोलिसांनी शुभम खैरनारला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास आता ‘सीबीआय’ करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT