पुणे

केशवनगरमध्ये मूलभूत सुविधांसाठी रहिवाशांचे आंदोलन

CD

मुंढवा, ता. ७ : केशवनगर परिसर टँकरमुक्त करावा, वाहतूक कोंडीतून सुटका करावी आणि सुरक्षित रस्त्यांसह मुबलक पाणीपुरवठा मिळावा, या मागण्यांसाठी स्थानिक सोसायट्यांमधील रहिवाशांनी आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन दिवसांपासून सायंकाळी नोकरदार वर्ग कामावरून घरी परतल्यानंतर विविध सोसायट्यांसमोर एकत्र येत महापालिकेच्या धोरणांचा निषेध व्यक्त करत आहेत.

गुरुवारी (ता. ६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास केशवनगर येथील पूर्वा सिल्व्हर सँडस आणि गेरा मिस्टी वॉटर या दोन सोसायट्यांच्या सदस्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. या आंदोलनात महिला, लहान मुले आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मागील १० वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, अनेक उच्चभ्रू सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र, त्या तुलनेत महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

केशवनगरमधील बाबा कल्याणी रस्ता आणि केशवनगर-मांजरी रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या वाहतूक कोंडीमुळे रहिवासी त्रस्त आहेत. महापालिका प्रशासन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे.
----------------
त्वरित उपाययोजना कराव्यात
केशवनगरला खराडीशी जोडणारा नदीवरील पूल १५ ऑगस्टला सुरू होणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर रेणुकामाता मंदिर चौकात मुंढवा चौकाप्रमाणेच मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पूल सुरू करण्यापूर्वीच महापालिकेने या चौकात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही रहिवाशांनी या वेळी केली. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT