फोटो ः केतन पासलकर
केतन पासलकरची नाबाद शतकी खेळी
पुणे, ता. ७ ः स्पार्टन क्रिकेट क्लब आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सून लीग’ मिश्र कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत केतन पासलकरच्या नाबाद (१२८) शतकाच्या जोरावर लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने डीएलएस पद्धतीनुसार जीएसके क्रिकेट क्लबचा १५९ धावांनी पराभव केला.
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना लेजंड्स स्पोर्ट्स क्लबने चार बाद २८८ धावा केल्या. या वेळी केतन पासलकरने ५९ चेंडूंत दहा चौकार व दहा षट्कारासह नाबाद १२८ धावांची खेळी केली. त्याला सचिन भोसलेने पाच चौकार व सहा षटकारांसह ६८ धावांची खेळी करत सुरेख साथ दिली. प्रतीक जावकरने दोन गडी बाद केले. पहिल्या डावानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि जीएसके संघाला १६.५ षटकांमध्ये २७८ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यांना नऊ बाद ११८ धावा करता आल्या अच्युत मराठे व नीरज आठवलेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. ‘सामनावीर’ हा मान केतन पासलकरने पटकाविला.
संक्षिप्त धावफलक ः
लेजंड्स स्पोर्ट्स क्लब - (२० षटकांत) ४ बाद २८८ (केतन पासलकर नाबाद १२८, सचिन भोसले ६८, ऐश्वर्य खोपकर ३३, प्रतीक जावकर २-३२) डीएलएस पद्धतीनुसार वि.वि. जीएसके क्रिकेट क्लब - (१६.५ षटकांत) ९ बाद ११८ प्रतीक जावकर ३३, भूषण देशपांडे २१, चिन्मय चिकोडे २१, नीरज आठवले २-८, अच्युत मराठे २-२२).
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.