पुणे

‘चतु:सूत्री यशाची गुरुकिल्ली’

CD

राजगुरुनगर, ता. २ : ‘‘यशस्वी माणूस होण्यासाठी ध्येयनिश्चिती, आत्मविश्वास, उत्तम नियोजन व कृतिशीलता ही चतु:सूत्री यशाची गुरुकिल्ली आहे,’’ असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रमुख यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत ते ‘यशस्वी व चांगला माणूस घडण्यासाठी’ या विषयावर बोलत होते.
महाजन पुढे म्हणाले, ‘‘माणूस म्हणून आपल्यामध्ये कोणतीही शारीरिक कमतरता असली तरी वाईट न वाटता त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा.‌ आपल्याकडे प्रोत्साहन देण्यापेक्षा चिडवणारी संस्कृती अधिक आहे. त्यामुळे पुढे येण्यास विद्यार्थी घाबरतात.’’
शिक्षण घेताना सर्वोत्तमाचा ध्यास घ्यायला हवा. माणसाचे जीवन अमूल्य असून सभोवतालच्या समाजजीवनाला प्रतिसाद द्या. प्रगतीच्या दिशेने नेतील असे मित्र निवडा. आपल्या कामाच्या ठिकाणी कार्यसंस्कृती विकसित करा. समर्पण भावनेने काम करा. व्याख्याने पुस्तके आणि चांगल्या माणसांच्या सहवासात राहा. जीवनात चांगला माणूस होण्याचे उद्दिष्ट ठेवा. त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा, सेवाभाव कर्तव्यदक्षता ही मूल्ये अंगी रुजवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
सूत्रसंचालन प्रा.‌ धनंजय बोऱ्हाडे यांनी केले. परिचय प्रा.‌ शिल्पा टाकळकर करून दिला. आभार तनिष्का शेलार हिने मानले.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT