चाकण, ता. १४ : खराबवाडी (ता. खेड) येथे गुरुवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी घसरल्यानंतर दोघेही पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली आले. स्वप्निल उल्हास राठोड (वय २३, रा. खराबवाडी, मूळ- यवतमाळ) आणि दत्ता महाजन (वय २५, रा. नांदेड) अशी मृतांची नावे आहेत.
महाळुंगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल आणि दत्ता हे दोघे दुचाकीवरून चाकणच्या दिशेने जात होते. खराबवाडी गावाजवळ त्यांची दुचाकी घसरली आणि त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरच्या चाकाखाली ते चिरडले गेले. अपघातानंतर चालक ट्रेलरसह पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.