पुणे

खेडच्या पूर्व भागात पावसाची जोरदार बॅटिंग

CD

दावडी, ता. २६ : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील खरपुडी, निमगाव, दावडी परिसरात शुक्रवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहू लागले.
काही ठिकाणी वाहने चिखलात व शेतात अडकल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुसरीकडे, या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पेरणी व लागवडीच्या कामांना आता वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला असून पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरत आहे.
एकीकडे मुसळधार पावसामुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाली असली, तरी शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Lohagad murder case: लोहगडावर मे महिन्यापासून ‘रेकी’, कॉल-मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट; केतन अग्रवाल खून प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

SCROLL FOR NEXT