पुणे

खडकवाडीत चार लाखांचा चारा खाक

CD

पारगाव, ता. १४ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील नाथा बबन वाळुंज आणि देवराम बबन वाळुंज या दोन भावांच्या कडब्याच्या वळईला बुधवार (ता. १४) दुपारी अचानक आग लागली. या आगीत सुमारे चार ट्रॅक्टर ट्रॉली भरेल एवढा कडबा जळून खाक झाला. या दुष्काळी परिस्थितीत जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात खाक झाल्याने संबंधित वाळुंज बंधूंचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गावाच्या लगत बेल्हे जेजुरी महामार्गालगत वाळुंज बंधूंचे घर व गोठ्याला लागूनच कडब्याची वळई होती. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. पुढील काही महिन्यांत जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा भासणार असल्याने वाळुंज यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरेल एवढा कडबा साठवून ठेवला होता. मात्र, त्यास अचानक आग लागली. नाथा आबाजी सुक्रे, संतोष रामभाऊ सुक्रे, अमोल सुक्रे, विश्वास सुक्रे, हौशीराम सुक्रे, संपत सुक्रे यांनी गावातील तरुणांना तसेच नागरिकांना घटनास्थळी तातडीने जाऊन पाईपने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत कडब्याची संपूर्ण वळई जळून खाक झाली होती. परंतु तरुणांनी गोठ्यातील चार गायी तसेच एका म्हशीचे दोर कापून तातडीने गोठ्याच्या बाहेर काढल्याने त्यांना वाचवण्यात यश आले. तसेच जवळच असलेले घरही आगीपासून वाचवण्यात यश आले.
दरम्यान, दुष्काळाच्या परिस्थितीत चार लाख रुपयांचा जनावरांचा चारा जळून खाक झाल्याने शासनाने तातडीने पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच अनिल डोके, उदय डोके, कमल सुक्रे, जयश्री डोके यांनी केली आहे.

07532

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पुण्याला मिळाले नवीन वैद्यकीय महाविद्यालय! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरु

Vastu Tips: कपाटाच्या वर चुकूनही ठेवू नका 'या' ५ गोष्टी; घरात येऊ शकते गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा! जाणून घ्या वास्तुनियम...

IPL 2027 Trade: यॉर्करने भल्याभल्यांना गार करणारा गोलंदाजाचं SRH संघात पुनरागमन, पण कोटींचं नुकसान; दिल्ली कॅपिटल्ससोबत मोठी ट्रेड

Mulshi News : दुष्काळग्रस्त असलेल्या तालुक्यांच्या यादीतून मुळशी तालुका वगळला; तालुक्यातील शेतकरी शासनाविरोधात आक्रमक

गोकुळच्या स्टेजवर जुना हिशेब? अमर खोत आणि बाबासाहेब असुर्लेकर यांच्यात वाद

SCROLL FOR NEXT