Khadakwasala Dam chaupati
Khadakwasala Dam chaupati sakal
पुणे

Khadakwasala Dam : खडकवासला धरण चौपाटीजवळ पाण्यात जाताय, तर मग हे वाचाच

निलेश बोरुडे

खडकवासला धरण चौपाटीजवळ पाण्यात उतरण्यास पाटबंधारे विभागाने घातली बंदी.

किरकटवाडी - खडकवासला धरण चौपाटीजवळ पाण्यात उतरण्यास पाटबंधारे विभागाने बंदी घातली असून, संबंधित पर्यटकांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच उद्यापासून खडकवासला धरण चौपाटी परिसरात पर्यटकांना पाण्यात उतरण्यापासून रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने दहा सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. पोलीस आणि पाटबंधारे विभाग आता उपद्रवी पर्यटकांवर संयुक्त कारवाई करणार आहे.

पुणे शहराची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक उतरुन मोठ्या प्रमाणात घाण करत होते. याबाबत सकाळ'ने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर पोलीस, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम व वन विभागाने संयुक्त पाहणी करत मागील आठवड्यापासून उपाययोजना करण्यास सुरुवात केली. चौपाटीवरील विक्रेत्यांच्या माध्यमातून हवेली पोलीसांनी धरणात उतरण्याच्या वाटा बंद करून घेतल्या व धरणाच्या बाजूने वाहने उभी राहू नयेत म्हणून कुंपण करुन घेण्यात आले आहे. याचा चांगला परिणाम मागील रविवारी दिसून आला. मात्र इतर दिवस पर्यटक पाण्यात उतरताना दिसून आले.

पाटबंधारे विभागाने आता खडकवासला धरण परिसरात अनेक ठिकाणी फलक लावले असून पाण्यात उतरणारांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. तसेच उद्यापासून दररोज दहा सुरक्षा रक्षक चौपाटी परिसरात तैनात असणार असल्याची माहिती खडकवासला धरण शाखा अभियंता गिरिजा कल्याणकर यांनी दिली आहे.

सुट्टीच्या दिवशी अनियंत्रित गर्दी....

खडकवासला धरण चौपाटीजवर सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक येतात. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची तुफान गर्दी दिसून येते. धरणाला संरक्षक भिंत किंवा कायमस्वरूपी कुंपण नसल्याने पर्यटकांना आवरणे कठीण होते. जरी प्रशासन उपाययोजना करत असले तरी गर्दीच्या तुलनेत पोलीस व सुरक्षा रक्षक यांची संख्या अत्यल्प असल्याने मर्यादा येत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कायमस्वरूपी संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करुन याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

'पाण्यात उतरण्याच्या वाटा बंद केलेल्या असताना अनेक पर्यटक तेथील अडथळे काढून आत शिरत होते. आता पाण्यात उतरणारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दररोज दहा सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.'

- गिरिजा कल्याणकर, खडकवासला धरण शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.

'शनिवार व रविवारसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने फलक लावल्याने त्याचाही फरक पडेल. रस्त्याचे काम सुरू असल्याने सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागालाही कामाचा वेग वाढविण्यास सांगितले आहे.'

- भाऊसाहेब ढोले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT