Khadakwasala-Dam-Water sakal
पुणे

Khadakwsala News : पाऊस कमी झाल्याने धरणातील आवक घटली

पावसाचा जोर मागील आठवड्यापेक्षा फार कमी झाला आहे. चार ही धरणातील पाण्याचा येवा (आवक) कमी झाला आहे.

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चार ही धरणांची एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. आज मंगळवार अखेर २६.०७ टीएमसी म्हणजे ८९.४४ टक्के पाणीसाठा झाला असतानाच पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे.

पावसाचा जोर मागील आठवड्यापेक्षा फार कमी झाला आहे. चार ही धरणातील पाण्याचा येवा (आवक) कमी झाला आहे. परिणामी पाणीसाठ्यात होणारी वाढ कमी झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चार ही धरणात २५ जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे २४ तासात १२७८ दशलक्ष घनफूट येवा(आवक) होता. त्यानंतर, काही दिवस तो ९००, ८०० दशलक्ष घनफूट पर्यत होता.

जुलैच्या शेवटच्या शेवटच्या २४ तासातील येवा ७५१ दशलक्ष घनफूट होता. शनिवारी ३८७, रविवारी ३०९, सोमवारी १९१ दशलक्ष घनफूट येवा होता. अशा प्रकारे येवा कमी होत गेला आहे. परिणामी पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणे कमी झाले आहे.

पानशेत धरणातून रविवारीपासून संध्याकाळी सुमारे ६०० क्युसेकने पाणी सांडव्याद्वारे अंबी नदीत सोडले आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाला आहे. मंगळवारी दिवसभरात खडकवासला येथे दोन, पानशेत- दोन, वरसगाव- दोन, टेमघर येथे चार मिलिमीटर पाऊस पडला आहे.

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी) / उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / १.८३ / ९२.६१

पानशेत- १०.६५ / १०.३५ / ९७.२०

वरसगाव- १२.८२ / ११.३२ / ८८.३३

टेमघर- ३.७१ / २.५७ / ६९.३२

चार धरणातील एकूण क्षमता २९.१५ टीएमसी

आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा २६.०७ टीएमसी म्हणजे ८९.४४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT