Khadakwasala Dam Sakal
पुणे

भारत सरकार, महाराष्ट्र शासन, पोलीस ते थेट न्यायाधीश; खाजगी वाहनांवर पाट्या लावून अनेकांची दादागिरी

खडकवासला धरण तसेच सिंहगड परिसरात सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परिणामी दर शनिवार व रविवारी दोन्ही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात.

निलेश बोरुडे

सिंहगड - कायद्याने मनाई असताना अनेक शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून सर्रासपणे 'भारत सरकार', 'महाराष्ट्र शासन', 'पोलीस' ते अगदी 'न्यायाधीश' अशा पाट्या खाजगी वाहनाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या दिसून येतात.काही खाजगी वाहनांमध्ये समोर पोलीस अधिकाऱ्याची टोपी ठेवलेली असते. विशेष करुन परिवारासह फिरण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून अशा पाट्यांचा वापर करून नियम मोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. खडकवासला धरण चौपाटी, सिंहगड किल्ला अशा ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली असताना या बेकायदेशीर पाट्या लावणारांची दादागिरी सुरू असल्याचे चित्र दिसून येते.

खडकवासला धरण तसेच सिंहगड परिसरात सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. परिणामी दर शनिवार व रविवारी दोन्ही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात व तासंतास पर्यटक वाहतूक कोंडीत अडकून पडतात. अशावेळी सरकारी नावाची पाटी लावलेल्या खाजगी वाहनधारकांकडून मधेच वाहन घालने, जोरजोरात हॉर्न वाजवणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे असे प्रकार सुरू असल्याचे दिसते. सर्वसामान्यांना वाहतूक नियम दाखवून दंड वसूल करणारे वाहतूक पोलीस अशा बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्या वाहनचालकांवर मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.

मोटार वाहन कायद्यातील तरतुदी

• मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना खाजगी वाहनांवर सरकारी नावाची पाटी वापरण्यास सक्त मनाई आहे.

• खाजगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 177 चे उल्लंघन ठरते.

• वेगवेगळ्या जनहित याचिकांच्या निकालातून न्यायालयाने अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

• अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊ शकते.

'अशा पाट्या लावून गुन्हेगार याचा गैरफायदा घेऊ शकतात. वाहतूक पोलीस किंवा आर.टी.ओ. अशा बेकायदेशीर पाट्या लावणाऱ्यांवर कारवाई करु शकतात. पहिल्यांदा असे कृत्य केल्यास शंभर रुपये तर दुसऱ्यांदा नियम मोडल्यास पाचशे रुपये दंड होऊ शकतो.'

- ॲड. शरद भोईटे, विधिज्ञ, जिल्हा व सत्र न्यायालय,पुणे.

'खाजगी वाहनांवर शासकीय नावाचे बोर्ड लावणे बेकायदेशीर आहे. अशा वाहनांचे फोटो काढून ठेवावे , त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.'

- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT