Sanjay Barate Sakal
पुणे

Sanjay Barate : भाजपचे माजी पदाधिकारी संजय बराटे यांची आत्महत्या

वारजे येथील संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

वारजे येथील संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

खडकवासला - वारजे येथील संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. भाजपचे माजी सरचिटणीस व वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते.

त्यांच्यामागे पत्नी एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वारजे येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून त्याचे ते सध्या अध्यक्ष होते. हवेली तालुक्याचे भाजपचे १९९५ दरम्यान सरचिटणीस होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यांनी 2007 मध्ये महापालिकेचीअपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते राजकारण सक्रिय राहिले नाही. भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते. वारजे भागीरथीनगर येथील त्यांच्या इमारतीत सूर्योदय परिवाराचा सत्संग असायचा. अनेकवेळा भय्यू महाराज यांचे अनेक कार्यक्रम झाले. काही काळ त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम केले होते.

वारजे एनडीए रस्त्यावर ते राहत असलेल्या इमारतीत त्यांचे कार्यालय होते. त्या कार्यालायत शुक्रवार संध्याकाळी त्यांच्या पत्नीस ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. वारजे पोलीस घटनास्थळी पोचले होते. शवविच्छेदनानंतर रात्री त्यांच्यावर वारजे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT