सिंचन भवन, पुणे - इंदापूर तालुक्‍याला कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत पांडुरंग शेलार यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राणारवी पवार, हनुमंतराव वाबळे, प्रदिप कणसे, विश्‍वजित चौगुले, प्रशांत धुमाळ, कैलास कणसे आदी.
सिंचन भवन, पुणे - इंदापूर तालुक्‍याला कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत पांडुरंग शेलार यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राणारवी पवार, हनुमंतराव वाबळे, प्रदिप कणसे, विश्‍वजित चौगुले, प्रशांत धुमाळ, कैलास कणसे आदी. 
पुणे

इंदापूर, दौंडसाठी खडकवासलातून पाणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्‍यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी खडकवासला धरणातून सोमवारी (ता. ९) रात्रीपासून कालव्याद्वारे तीनशे क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. 
शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पाणी प्रश्‍नाची गंभीर स्थिती मांडली होती.

शेतीसाठी पूर्ण आवर्तन मिळावे, याबाबत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आणि खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांना निवेदन दिले.

त्यावर कार्यकारी अभियंता शेलार यांनी तीनशे क्‍युसेकने पाणी सोडण्याची व्यवस्था करीत आहोत. कालव्याद्वारे पूर्ण क्षमतेने इंदापूरला पाणी देऊ, अशी ग्वाही दिली. शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष राणारवी पवार, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य हनुमंतराव वाबळे, प्रदीप कणसे, विश्‍वजित चौगुले, प्रशांत धुमाळ, कैलास कणसे आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

तसेच, इंदापूरच्या पाणी प्रश्नाबाबत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्याकडे शेतीला पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT