Pune 
पुणे

दौंड, इंदापूरच्या शेतकऱ्यांसाठी खूशखबर; खडकवासला कालव्याची दुरुस्ती पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत सुरू करण्यात आलेले खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून उद्या (रविवार) सकाळी सहा वाजल्यापासून दौंड, इंदापूर व हवेली या तालुक्यांतील शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सुमारे चाळीस दिवसांचे हे आवर्तन असणार आहे.

उद्या सकाळी सहा वाजता 350 क्युसेक, दुपारी बारा वाजता 700 क्युसेक व चार वाजल्यापासून 951 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला धरण शाखा उपअभियंता व कालव्या संबंधी काम पाहणारे पोपटराव शेलार यांनी दिली. खडकवासला कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणी बंद करण्यात आले होते. कालव्याच्या दुरुस्ती दरम्यान पाटबंधारे विभागाचे लहान-मोठे पोकलेन मशीन व वीस डंपरच्या सहाय्याने कालव्यातील गाळ काढण्यात आला. ज्या ठिकाणी कालव्याचा भराव पावसाने कमकुवत झाला होता अशा ठिकाणी मुरूम टाकून मजबुतीकरण करण्यात आले. भरावावर उगवलेली झुडपे तोडण्यात आली. प्लास्टिक व इतर कचरा काढण्यात आला. अशी माहिती शेलार यांनी दिली.

"पुढच्या टप्प्यात फुरसुंगी पासून पुढे कालव्याची दुरुस्ती केली जाणार आहे. नागरिकांनी कालव्यामध्ये कचरा फेकू नये. प्लास्टिक,जुने कपडे, निर्माल्य भरलेल्या प्लास्टिक पिशव्या असा कचरा मोठ्या प्रमाणात कालव्यातून काढण्यात आलेला आहे. कचर्‍यामुळे पाणी दूषित होत आहे. कालव्याच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा कालव्यामध्ये फेकू नये", असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT