Khadakwasala-Dam-Water sakal
पुणे

खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात 1000 क्युसेक दाबाने पाणी सोडणार

खडकवासला व परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे.

निलेश बोरुडे

खडकवासला व परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे.

किरकटवाडी - खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने आज रात्री साडेअकरा वाजता खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात 1000 क्युसेक दाबाने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे स्वारगेट उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली आहे.

खडकवासला व परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरण 75.60 टक्के भरले होते. सायंकाळच्या सुमारास पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या खडकवासला उजव्या कालव्यातूनही 1005 क्युसेक दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

'आज रात्री साडेअकरा वाजता खडकवासला धरणातून 1000 क्युसेक दाबाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.'

- योगेश भंडलकर, स्वारगेट उपविभागीय अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT