पुणे

खडकवासला प्रकल्पात 4 दिवसांत 3 महिन्यांचा पाणीसाठा

शरयू काकडे

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला(Khadakwasla) प्रकल्पामध्ये मागील चार दिवसांत पाणीसाठ्यात पाच अब्ज घनफुटांनी (पाच टीएमसी) वाढ झाली आहे. शहराला जवळपास सुमारे तीन महिने पुरेल इतका हा पाणीसाठा आहे. खडकवासला प्रकल्पात सोमवारी सायंकाळपर्यंत २३ टीएमसी (७९ टक्के) पाणीसाठा(Water Storage) झाला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत १३ टीएमसीने(TMC) अधिक आहे. गतवर्षी खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ९.८६ टीएमसी पाणीसाठा होता. (Khadakwasla project accumulated 3 months water storage in 4 days Pune Rain Update snk94)

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस(Rain) झाला. सोमवारी दिवसभरात टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिलिमीटर, वरसगाव २३ मिमी, पानशेत २४ मिमी आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

‘उजनी’त १८ टीएमसीची वाढ

उजनी धरणात २३ जुलै रोजी केवळ ०.९१ टीएमसी (१.७० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणात १८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणांतील सोमवारी सायंकाळपर्यंतचा उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि कंसात टक्केवारी

टेमघर २.३४ (६३.०८)

वरसगाव ९.६० (७४.८७)

पानशेत ९.११ (८५.५५)

खडकवासला १.९७ (१००)

पवना ६.८७ (८०.७४)

माणिकडोह ३.२७ (३२.१०)

येडगाव १.३३ (६८.२०)

वडज ०.५८ (४९.५६)

डिंभे ८.०८ (६४.६६)

घोड १.२५ (२५.७३)

विसापूर ०.०७ (७.९३)

कळमोडी १.५१ (१००)

चासकमान ५.९१ (७७.९८)

भामा आसखेड ६.११ (७९.६६)

वडिवळे ०.९१ (८४.७३)

आंद्रा २.९२ (१००)

कासारसाई ०.४९ (८५.६२)

गुंजवणी ३.२४ (८७.७७)

नीरा देवघर १०.५४ (८९.८६)

भाटघर १४.९५ (६३.६३)

वीर ९.०७ (९६.४१)

नाझरे ०.०७ (१२.०३)

उजनी १८.८१ (३५.११)

इतर धरणांतील सोमवारी सकाळपर्यंतचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) आणि टक्केवारी

कोयना ८३.३१ (८३.२०)

धोम ८.९० (७६.१३)

वारणा २४.३७ (८८.५७)

दूधगंगा १८.५६ (७७.४०)

राधानगरी ७.६३ (९८.२४)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT